वृत्त क्रमांक 608
कृषि तंत्र पदविका प्रथम वर्ष अभ्यासक्रमासाठी प्रवेश सुरु
नांदेड दि. 12 जून :- वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ अंतर्गत कृषीतंत्र पदविका अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्ष 2025-26 साठी प्रवेश प्रक्रिया विद्यापीठाच्या संकेतस्थळावर सुरू झाली आहे. 25 जून पर्यंत मुदत असून विद्यार्थ्यांनी प्रवेश घेण्याचे आवाहन विद्यापीठाकडून करण्यात आले आहे. कृषी तंत्र पदविका अभ्यासक्रम प्रवेशाची माहिती पुस्तिका प्रवेश अर्जासह http://vnmkv.agridiplomaadmission.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील कृषि तंत्र शिक्षण विद्याशाखेअंतर्गत 8 घटक शासकीय अनुदानित 1 घटक शासकीय विनाअनुदानित तसेच 51 खाजगी विनाअनुदानित कृषि तंत्र विद्यालय कार्यरत आहेत. 15 ऑक्टोंबर 1963 पासून नांदेड येथे स्थापन कृषि तंत्र विद्यालय जुने व या क्षेत्रातील मातृभाषेतून शिक्षण देणारे उच्च दर्जाचे विद्यालय आहे.
कृषि पदविका अभ्यासक्रमातून प्रथम वर्षाकरिता कृषी मुलतत्वे, प्रमुख पिकांचे उत्पादन तंत्रज्ञान, फळे भाजीपाला उत्पादन तंत्रज्ञान, कृषी अवजारे यंत्रे व आधुनिक सिंचन पद्धती, पीक संरक्षण, ग्रामीण समाजशास्त्र कृषी विस्तार व माहिती तंत्रज्ञान तसेच द्वितीय वर्षाकरिता सेंद्रिय शेती, बीजोत्पादन तंत्रज्ञान, रोपवाटिका व्यवस्थापन, फुल शेती व हरितगृह तंत्रज्ञान, पशुसंवर्धन, कुक्कुटपालन व रेशीम उद्योग, शेतमाल प्रक्रिया, सहकार पतपुरवठा व पणन त्याचबरोबर या शिक्षणाच्या धर्तीवर प्रकल्प अहवालातून आळंबी उत्पादन, गांडूळ खत निर्मिती, फुल शेती, शेडनेट शेती, कुक्कूटपालन, वराहपालन, दुग्धव्यवसाय, रेशीम उद्योग इत्यादी उद्योगात रोजगार निर्मिती करण्यासाठी प्रात्यक्षिकाद्वारे व्यवसायाभिमुख शिक्षण दिले जाते.
कृषि पदवीधारकास कृषी सहाय्यक, ग्रामसेवक, जलसंपदा विभागामध्ये कालवा निरीक्षक, सहकारी साखर कारखाना व महामंडळात नोकरीच्या संधी, शालेय शिक्षणामध्ये कृषी विषयाचा समावेश झाल्यास कृषी शिक्षक म्हणून शासकीय अथवा खाजगी क्षेत्रात सेवेच्या संधी आहेत. कृषी सेवा केंद्र खते व बियाणे परवाना मिळविण्यासाठी पात्र अभ्यासक्रम असून केवळ नांदेड येथील विद्यालयात आयराईज प्रकल्पांतर्गत सिजेंटा फाउंडेशनचे कोर्स करण्याची संधी आहे. हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यास खते बियाणे कीटकनाशक व बुरशीनाशक बनविणाऱ्या नामांकित कंपनीत नोकरीची संधी तसेच स्वयम रोजगारासाठी उद्योग उभारण्यास प्रकल्प सहायता देखील मिळते. कृषीतंत्र पदविका प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना 30 वर्षाची वयोमर्यादा व मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी वयाची अट 5 वर्षांनी शिथिलक्षम राहील. माजी सैनिकासाठी 45 वर्ष आहे.
माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा परीक्षा मंडळाची माध्यमिक शाळा परीक्षा एस. एस. सी. 10 वी किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण प्रवेशासाठी इयत्ता दहावीची मूळ गुणपत्रके, ऑनलाईन अर्ज व तात्पुरता प्रवेशपत्र, विद्यालय किंवा शाळा सोडल्याचा मूळ दाखला, रहिवासी प्रमाणपत्र, 12 टक्के गुणांचा अभिभार मिळवण्यासाठी सात/बारा शेतकरी किंवा भूमिहीन शेतमजूर असल्याबाबतचे सक्षम प्राधिकरण अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र, जातप्रमाणपत्र, जातवैधता प्रमाणपत्र, गॅप असल्यास गॅप प्रमाणपत्र इत्यादी कागदपत्रे आवश्यक आहेत.
कृषी प्रवेशासाठी
येथे करा अर्ज
कृषी
तंत्र पदविका अभ्यासक्रम प्रवेश माहिती पुस्तिका प्रवेश अर्जासह http://vnmkv.agridiplomaadmission.ac.in
या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. नांदेड येथील
कृषी तंत्र विद्यालयात प्रवेशाकरिता कोड क्रमांक 431235 हा असून यासाठी संपर्क
प्रभारी शिक्षण विजेश जाधव 9356839738 या क्रमांकावर करावा, असे आवाहन प्राचार्य डॉ. नरेशकुमार जायेवार (8329174300) यांनी केले आहे.
000000
No comments:
Post a Comment