Thursday, June 12, 2025

वृत्त क्रमांक 604

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत वृक्ष लागवड

नांदेड, दि. १२:- आजच्या काळात झपाटयाने होणाऱ्या औदयोगिकरणामुळे वृक्षतोड मोठया प्रमाणात होत आहे.  त्याचा परीणाम  जागतिक तापमान वाढीवर होत आहे.  नागरीकांच्या आरोग्याची सुरक्षा तसेच भावी पिढीच्या भविष्यासाठी हरीत नांदेड अभियान- 2025 राबविण्यात येत आहे.  

त्या अनुषंगाने नांदेड वाघाळा शहर महानगर पालिका, गुरूव्दारा लंगर साहिब नांदेड, वक्षमित्र फाउंडेशन नांदेड तसेच श्री गुरू गोबिंदसिंघजी शासकीय औदयोगिक प्रशिक्षण संस्था नांदेड यांच्यावतीने औदयोगिक प्रशिक्षण संस्था नांदेड येथे १२ जून २०२५ रोजी १०१ वृक्ष लागवड करण्यात आली.    

या कार्यक्रमासाठी प्रमूख अतिथी म्हणून उपायुक्त नितीन गाढवे, सहा. आयुक्त रमेश चवरे क्षेत्रीय कार्यालय क्र.3, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी सुर्यवंशी एस. व्ही. , उपप्राचार्य तथा प्रबंधक कंदलवाड व्ही. डी. हे उपस्थित होते.    

तसेच आयएमसी सदस्य हर्षदभाई शहा, अभिजीत रेणापूरकर, प्रजापिता ब्रम्हकुमारी केंद्राच्या स्वाती बहेनजी, मिना बहेनजी, उदयान अधिकरी डॉ मिर्झा बेग, तसेच मोठया प्रमाणात पर्यावरण प्रेमी नागरीक संस्थेतील सर्व कर्मचारी तसेच प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.  कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन संस्थेचे रा.से.योजनेचे कार्यक्रमाधिकारी दिनेश पोतदार यांनी केले.

००००००



No comments:

Post a Comment

वृत्त क्र.  724 देशाचा समृध्दीसाठी विद्यार्थ्यांची बौध्दीक क्षमता वाढवावी – राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे नांदेड, दि. 14 जुलै : जगात शि...