Thursday, June 12, 2025

 वृत्त क्रमांक 605 

दहावी-बारावी परीक्षेचे प्रवेशपत्र उपलब्ध 

नांदेड दि. 12 जून :- माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र इयत्ता 10 वी  व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता 12 वी परीक्षा जून-जुलै 2025 साठी सर्व विभागीय मंडळातील विद्यार्थ्यांना ऑनलाईन www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर प्रवेशपत्र (हॉलतिकीट ) उपलब्ध करून देण्यात आली आहेत. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्याशी संलग्न असलेल्या सर्व माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांचे मुख्याध्यापक, प्राचार्य, शिक्षक, विद्यार्थी व पालकांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन शालेय शिक्षण मंडळाच्यावतीने करण्यात आले आहे. 

शिक्षण मंडळाच्या www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर गुरुवार 12 जून 2025 पासून Admit Card या लिंकव्दारे डाऊनलोड करण्याकरिता उपलब्ध होतील. यासंदर्भात काही तांत्रिक अडचण उद्भवल्यास उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी विभागीय मंडळाकडे संपर्क साधावा. 

ऑनलाइन प्रवेशपत्राबाबत सूचना

जून-जुलै 2025 साठी सर्व विभागीय मंडळाच्या कार्यकक्षेतील सर्व माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी इ. 10 वी व 12 वी परीक्षेची ऑनलाईन प्रवेशपत्रे प्रिंट करून विद्यार्थ्यांना द्यावयाची आहेत. प्रवेशपत्र ऑनलाईन पद्धतीने प्रिंटींग करताना विद्यार्थ्यांकडून त्यासाठी कोणतेही वेगळे शुल्क घेऊ नये. सदर प्रवेशपत्राची प्रिंट काढून त्यावर मुख्याध्यापक, प्राचार्य यांचा शिक्का उमटवून स्वाक्षरी करावी. ज्या आवेदनपत्रांना "Paid असे Status प्राप्त झालेले आहे त्यांचीच प्रवेशपत्रे Paid Status Admit Card" या पर्यायाद्वारे उपलब्ध होतील. 

अति विलंबाने आवेदनपत्रे भरलेल्या व Extra Seat No विभागीय मंडळामार्फत दिलेल्या विद्यार्थ्यांची प्रवेशपत्रे "Extra Seat No Admit Card" या पर्यायाद्वारे उपलब्ध होतील. डाउनलोड केलेल्या प्रवेशपत्रामध्ये नाव, आईचे नाव, जन्म तारीख व इतर दुरुस्त्या असल्यास अथवा विषय, माध्यम बदल असल्यास प्रचलित पद्धतीनुसार विभागीय मंडळात प्रत्यक्ष संपर्क साधून योग्य त्या दुरूस्त्या करण्यात याव्यात. 

ज्या आवेदनपत्रांना Paid असे Status प्राप्त झाले नाही अशा आवेदनपत्रांचे शुल्क प्राप्त झाल्यानंतर त्यांचे Status अपडेट होवून "Late Paid Status Admit Card" या Option द्वारे त्यांची प्रवेशपत्र उपलब्ध होतील. फोटो सदोष असल्यास त्यावर विद्यार्थ्याचा फोटो चिकटवून त्यावर संबंधित मुख्याध्यापक, प्राचार्य यांनी शिक्का मारून स्वाक्षरी करावयाची आहे. 

प्रवेश पत्र विद्यार्थ्यांकडून गहाळ झाल्यास संबंधित माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी पुनःश्च प्रिंट काढून त्यावर लालशाईने द्वितीय प्रत (Duplicate) असा शेरा देऊन विद्यार्थ्यास प्रवेश पत्र द्यावयाचे आहे. जून-जुलै 2025 च्या इ. 10 वी व 12 वी परीक्षेसाठी प्रविष्ट झालेले सर्व विद्यार्थी, पालक, शिक्षक, मुख्याध्यापक, प्राचार्य, सर्व माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी या बाबींची नोंद घेऊन त्याप्रमाणे उचित कार्यवाही करावी, असेही आवाहन राज्य मंडळाचे सचिव देविदास कुलाळ यांनी केले आहे.

00000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र. 720   डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय रुग्णालयात हिमालया बेबी फि डिंग सेंटर चा लोकाअर्पण सोहळा       नांदेड दि. 11 ...