वृत्त क्रमांक 603
प्रधानमंत्री धरती आबा जनजाती ग्राम उत्कर्ष अभियानात
15 ते 30 जून या कालावधीत विशेष शिबिराचे आयोजन
माहूर 4 तर किनवट तालुक्यातील 128 गावांचा समावेश
शिबिरात अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांना विविध प्रमाणपत्रांचे वितरण
नांदेड दि. 12 जून :- प्रधानमंत्री धरती आबा जनजाती ग्राम उत्कर्ष अभियानात नांदेड जिल्ह्यातील माहूर व किनवट तालुक्यातील गावांमध्ये 15 ते 30 जून 2025 या कालावधीत शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात आदिवासी समाजाच्या लाभार्थ्यांना विविध आवश्यक प्रमाणपत्रे, कागदपत्रे यांचे वितरण करण्यात येणार आहे. तरी लाभार्थ्यांनी या शिबिराचा आवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी जेनित चन्द्रा दोन्तुला यांनी केले आहे.
आदिवासी जमातींच्या आर्थिक व सामाजिक विकासासाठी धरती आबा जनजाती ग्राम उत्कर्ष अभियान ही योजना राबविण्यात येत आहे. या योजनेद्वारे आदिवासी जमातींच्या सामाजिक व आर्थिक विकास साध्य करण्याचे उद्दिष्ट आहे. या योजनेत नांदेड जिल्ह्याचा समावेश असून नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील 128 गावे तर माहूर तालुक्यातील 4 गावांचा समावेश आहे.
दिनांक 15 ते 30 जून 2025 या कालावधीत किनवट तालुक्यातील 55 गावांमध्ये अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांना आधार कार्ड, मतदान, राशनकार्ड, आयुष्यमान भारत कार्ड, जातीचे प्रमाणपत्र, पीएम किसान, जनधन खाते, सिकलसेल आजाराची तपासणी इत्यादी आवश्यक कागदपत्रे या शिबिराच्या माध्यमातून देण्यात येणार आहेत.
धरती आबा जनजागृती ग्राम उत्कर्ष अभियानात शिबिराचे ठिकाण व दिनांक पुढीलप्रमाणे आहे. दि. 15 जून रोजी जावरला, 16 जून रोजी बोध, उनकदेव, पिंपळगाव सी, निचपूर, 17 जून रोजी पिंपळगाव की,थारा, पाटोदा ची, बेल्लोरी धा, 18 जून रोजी सावरगाव, नंदगाव, तल्हारी, पाथरी, 19 जून रोजी चिंचखेड, नागापूर, उमरी बा, दहेली तांडा, 20 जून रोजी धारसांगवी सी, मांडवी, कोठारी सी, पाटोदा बु, पिंपळगाव सी, 23 जून रोजी सिंदगी मो, राजगड, अंबाडी, लोणी, 24 जून रोजी कनकवाडी, बेल्लोरी की, मारेगाव व , घोटी, 25 जून 2025 रोजी घोगरवाडी, मांडवा की, कोठारी ची, बोधडी खु, 26 जून रोजी प्रधानसांगवी, बेंदी , चिखली बु., बोधडी बु., 27 जून रोजी आंदबोरी ची, सिंगारवाडी, परोटी, सावरी, 28 जून रोजी रिठा, जलधरा, भीसी, ईस्लापूर, कोसमेट, 30 जून रोजी शिवणी, आंदबोरी ई. मलकाजम, आप्पाराव पेठ तर माहूर तालुक्यातील मच्छिंद्र पार्डी येथे 16 जून रोजी तर वझरा शे. फ. येथे 23 जून रोजी, 30 जून रोजी साकुर व मलकागुडा येथे शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तरी लाभार्थ्यांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी जेनित चन्द्रा दोन्तुला यांनी केले आहे.
00000
No comments:
Post a Comment