वृत्त क्रमांक 245
बालकांची विशेष आरोग्य तपासणी मोहिम सुरु
आज उपमुख्यमंत्री अजित पवार व आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते होणार राज्यस्तरीय उदघाटन
नांदेड दि. 28 फेब्रुवारी :- राज्य शासनाने संपूर्ण राज्यात “राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम" अंतर्गत विद्यार्थ्यांची विशेष तपासणी मोहिम या महत्वाकांक्षी अभियानाची घोषणा केलेली आहे. त्यानुसार या मोहिमेच्या शुभारंभ संपूर्ण राज्यामध्ये 1 मार्च 2025 रोजी इंदिरा गांधी मॉडेल स्कूल, औंध, पुणे येथून होणार आहे. या मोहिमेचे उदघाटन राज्याचे उप मुख्यमंत्री अजित पवार व सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते सकाळी 8.30 वाजता होणार आहे.
या उद्घाटन कार्यक्रमास राज्यातील प्रत्येक तालुक्यातील एक शाळा व जिल्हा स्तरावरील एक शाळा दूरभाष्य प्रणाली व्हीसीद्वारे सोहळ्यास मान्यवर उपस्थित राहणार आहेत. त्या अनुषंगाने नांदेड जिल्हयातील सर्व शासकीय, निमशासकिय शाळा, शासकीय अंगणवाडयामधील 0 ते 18 वर्षापर्यंतच्या बालकांची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. या तपासणी दरम्यान आजारी आढळून आलेल्या बालकांवर त्वरीत निशुल्क उपचार व संदर्भ सेवा तसेच आवश्यकतेनुसार नंतर मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.
त्यानुसार आरबीएसके कार्यक्रमाच्या मोहिमेचे उद्घाटन 1 मार्च 2025 रोजी सकाळी 8.30 वाजता प्राथमिक शाळा क्र.4 व माध्यमिक शाळा नांदेड वाघाळा महानगरपालीका जंगमवाडी नांदेड तसेच तालुकास्तरावरील शारदा भवन हायस्कूल अर्धापूर, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा थेरबन भोकर, कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय बिलोली, मौलाना अबुल कलाम आझाद हायस्कूल देगलूर, ग्रीन फील्ड नॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज धर्माबाद, अनुसुचित जाती मुलाची शाळा हादगाव, जिल्हा परिषद नेहरू नगर हिमायत नगर, मनोविकास प्राथमिक शाळा, कंधार, सरस्वती विद्या मंदिर किनवट, जिल्हा परिषद शाळा लोहा, अनुसुचित जाती व नवबौद्ध मुलींची शासकिय शाळा माहूर, श्री सरस्वती विद्या मंदिर मुदखेड, जिल्हा परिषद हायस्कूल मुखेड, लिटिल स्टेप इंग्लिश स्कूल नायगाव, व कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय उमरी इत्यादी शाळांत स्थानिक लोकप्रतिनिधी व अधिकारी यांच्या हस्ते पार पडणार आहे.
00000
No comments:
Post a Comment