वृत्त क्रमांक 242
संडे ऑन सायकल रॅलीमध्ये
मोठया संख्येने सहभागी व्हावे
नांदेड दि. 28 फेब्रुवारी : आयुक्त क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नांदेडच्यावतीने “फिट इंडिया मुव्हमेंट फिटनेस का डोस आधा घंटा रोज” अंतर्गत संडे ऑन सायकल रॅलीचे आयोजन 2 मार्च,2025 रोजी करण्याबाबत केंद्र शासनाने महाराष्ट्रातील सर्व जिल्हयामध्ये करण्याचा निर्णय घेतला आहे.
त्यानुसार नांदेड जिल्हयात जिल्हा प्रशासन, शिक्षण विभाग, जिल्हा परिषद, नांदेड व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नांदेडच्या वतीने दि.02 मार्च,2025 रोजी सकाळी 6.30 वा. “फिट इंडिया मुव्हमेंट फिटनेस का डोस आधा घंटा रोज” अंतर्गत संडे ऑन सायकल रॅलीचे आयोजन जिल्हा क्रीडा संकुल, श्री गुरुगोबिंदसिंघजी स्टेडीयम मुख्य प्रवेशद्वार येथून करण्यात आले आहे.
या रॅलीचा मार्ग स्टेडीयम मुख्य प्रवेशद्वार येथून सुरुवात होवून आयटीएम कॉलेज मार्गे-आयटीआय चौक- श्रीनगर- वर्कशॉप कॉर्नर मार्गे आनंदनग- वसंतराव नाईक पुतळा (नागार्जुना हॉटेल)- अण्णाभाऊ साठे चौक मार्गे- आयटीएम व श्री गुरुगोबिंदसिंघजी स्टेडीयम मुख्यद्वार नांदेड येथे समाप्त होईल.
“फिट इंडिया
मुव्हमेंट फिटनेस का डोस आधा घंटा रोज” यामुळे आपले शरीर निरोगी, तंदुरुस्त व बळकट राहण्यास
मदत होईल याकरीता फिटनेस जनजागृती करणेकरीता जिल्हयातील खेळाडू मुले-मुली, शारीरिक
शिक्षक, क्रीडा शिक्षक, क्रीडा प्रमुख, विविध क्रीडा संघटनेचे पदाधिकारी व विविधि
विभागाचे अधिकारी/ कर्मचारी, नागरीक, महिला व क्रीडाप्रेमी यांनी या संडे ऑन सायकल
रॅलीमध्ये आपल्या सायकलीसह मोठया संख्येने सहभागी व्हावे. व वेबसाईड (https://fitindia.gov.in/cyclothon.2024)
यावर ऑनलाईनद्वारे आपली नोंदणी करावी.
व अधिक माहितीकरीता श्री. बालाजी शिरसीकर (राज्य क्रीडा मार्गदर्शक) यांचेशी
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नांदेड येथे संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा
क्रीडा अधिकारी जयकुमार टेभंरे यांनी केले आहे.
00000
No comments:
Post a Comment