वृत्त क्रमांक 239
महिलांचे लैंगिक छळापासून संरक्षण
तीन जागांसाठी अर्ज करण्याचे आवाहन
नांदेड दि. 28 फेब्रुवारी
: महिला व बाल कल्याण विभागामार्फत स्थापन करण्यात येणाऱ्या महिलांचे लैंगिक
छळापासून संरक्षण समितीवरील अध्यक्ष व दोन सदस्य यासाठी नियुक्ती करण्यास्तव नागरिकांमधून
नामांकने मागविण्यात येत आहेत. 6 मार्च पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या समितीचे अध्यक्ष
व दोन सदस्य निवडायचे आहेत. त्यातील एक सदस्य विधी विभागाशी संबंधित असावा. दुसरा
सदस्य हा एसी, एसटी, ओबीसी या पैकी एका गटातील असावा. तर अध्यक्ष पदासाठी सामाजिक
कार्याचा पाच वर्षाचा अनुभव असावा. जिल्हास्तरावरील या समितीसाठी 6 मार्च 2025 पर्यंत
जिल्हा माहिला व बालकल्याण विकास कार्यालय महात्मा फुले मार्केट मागे गणेशनगर रोड
नांदेड यांच्याकडे अर्ज सादरण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
0000
No comments:
Post a Comment