Wednesday, September 4, 2024

 वृत्त क्र. 807 

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे नांदेडहून दिल्लीकडे प्रयाण 

नांदेड, दि. 4 सप्टेंबर : नांदेड येथील तख्त सचखंड श्री हुजूर साहिब गुरुद्वारा येथे गुरुग्रंथ साहिब यांचे दर्शन घेतल्यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे श्री गुरुगोविंद सिंघजी विमानतळ नांदेड येथून भारतीय वायुसेनेच्या विमानाने सायंकाळी 6.10 वा. दिल्लीकडे प्रयाण झाले.  

यावेळी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, ग्रामविकास पंचायतराज व पर्यटन मंत्री तथा पालकमंत्री गिरीश महाजन, विभागीय आयुक्त दिलीप गावडे, अतिरिक्त पोलीस महासंचालक कृष्णप्रकाश, जिल्हाधिकारी अभिजित राऊत, पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, कमांडिग ऑफिसर कर्नल एम. रंगाराव आदींची उपस्थिती होती.

00000







No comments:

Post a Comment

  ‘जीडीसीए’ परीक्षेसाठी अर्ज करण्याची मुदत वाढवली अकोला, दि. ३ : जी. डी. सी. अँड ए आणि सीएचएम परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत दि. ७ मा...