Wednesday, September 4, 2024

 वृत्त क्र. 808

अल्पसंख्याक विद्यार्थ्याना परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्ती

नांदेड, दि. 4 सप्टेंबर : -सन 2024-25 मध्ये राज्यातील अल्पसंख्याक समुदायातील विद्यार्थ्यासाठी परदेशात पदव्युत्तर पदवी व पी.एच.डी अभ्यासक्रमासाठी शिष्यवृत्ती योजनेतर्गंत विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यासाठी शासनाच्या अल्पसंख्याक विभागाने मंजुरी दिलेली आहे. याबाबत महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ताज्या घडामोडीमध्ये विस्तृत जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे.

 

सन 2024-25 या शैक्षणिक वर्षात अल्पसंख्याक समुदायातील विद्यार्थ्यांनी परदेशात पदव्युत्तर पदवी व पीएचडी अभ्यासक्रमासाठी शिष्यवृत्ती योजनेतर्गत  लवकरात लवकर आयुक्त समाज कल्याण आयुक्तालय म.रा. पुणे यांचे स्तरावर 6 सप्टेंबर 2024 पर्यत अर्ज करावेत, असे आवाहन सहायक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांनी केले आहे.

00000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.  855   जिल्ह्यात  " हरित ऊर्जा सौर क्रांती "  मो ही म     ·    5 हजार   पेक्षा जास्त लोकसं ख्येचे गाव  मॉडेल सोलर व्ह...