वृत्त क्र. 806
बालकांचे लैंगिक शोषणास प्रतिबंध, उपाययोजनेवर प्रशिक्षण
नांदेड, 4 सप्टेंबर :- जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय नांदेड व अर्पण संस्था मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने हॉटेल विसावा येथे 'बालकांचे लैंगिक शोषणास प्रतिबंध व उपाययोजना' या विषयावर आयोजित प्रशिक्षणाचे उद्घाटन श्रीमती रूपाली रंगारी कोल्हे यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रशिक्षणास बालकांच्या विविध विषयांवर काम करणारे अधिकारी, कर्मचारीवर्ग, अशासकीय संस्थेचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रशिक्षणामध्ये बालकांसोबत अत्याचाराच्या घटना घडू नयेत यासाठी कशा प्रकारे काळजी घेतली पाहिजे, बालके अनुचित, अडचणीच्या परिस्थितीमध्ये आहेत हे कसे ओळखावे, त्यांच्यावर होणारा अन्यायाला वेळीच पायबंद कसा घालावा, बालकांचे व पालकांचे समुपदेशन कशापद्धतीने करावे याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.
अधिकारी, कर्मचारी वर्गाची संवेदनशीलता, ज्ञान, कौशल्य वृद्धिंगत करणे व बालकांशी संबंधित विषय कौशल्याने हाताळणे व बदलापूर घटनेची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी सर्व यंत्रणेने सतर्क राहावे या हेतूने महिला व बालविकास विभागाकडून या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे.
00000
No comments:
Post a Comment