Friday, July 12, 2024

  वृत्त क्र. 583

दहावी, बारावी पुरवणी परीक्षा केंद्राच्या परिसरात प्रतिबंधात्मक आदेश

नांदेड दि. 12 :- जुलै / ऑगस्ट-2024 मध्ये घेण्यात येणाऱ्या इयत्ता 10 वी 12 वीची पुरवणी परीक्षा 18 विविध परीक्षा केंद्रावर घेण्यात येत आहे. परीक्षेतील गैरप्रकार/कॉपी रोखण्यासाठी परीक्षा केंद्र परिसरात भारतीय नागरीक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 अन्वये 16 जुलै ते 8 ऑगस्ट 2024 या कालावधीत प्रतिबंधात्मक आदेश लागू केल्याचे जिल्हादंडाधिकारी नांदेड यांनी कळविले आहे.

इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षा केंद्रापासून शंभर मीटरच्या परिसरात 16 जुलै ते 8 ऑगस्ट 2024, सुट्टीचे दिवस, रविवार वगळून सकाळी 9 ते रात्री 8 वाजेपर्यंत या कालावधीत परीक्षार्थी व परीक्षेच्या कामाशी संबंधीत असलेले अधिकारी व कर्मचारी या व्यतिरिक्त इतर कोणत्याही व्यक्तीस प्रवेश करता येणार नाही. तसेच या वेळेत परीक्षा केंद्राच्या परिसरातील 100 मीटर पर्यंतची सर्व सार्वजनिक टेलिफोन्स एसटीडी, आयएसडी, भ्रमणध्वनी, पेजर, फॅक्स, झेरॉक्स आणि ध्वनिक्षेपक चालू ठेवण्यास आणि परीक्षार्थी व परीक्षेच्या कामाशी संबंधीत असलेले अधिकारी व कर्मचारी व्यतिरिक्त इतर कोणत्याही व्यक्तीस कॅल्क्युलेटर, ट्रान्झिस्टर, रेडिओ, लॅपटॉप, तत्सम साहित्य परीक्षा केंद्राच्या 100 मीटरपर्यंत परिसरात वापरण्यास व बाळगण्यास तसेच परीक्षा केंद्रात नेण्यास प्रतिबंध करण्यात आले आहे.
000000

No comments:

Post a Comment

  वृत्त  क्र.  112 राज्यमंत्री मेघना बोर्डीकर साकोरे आज नांदेडमध्ये   जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक   नांदेड दि. 27 जानेवारी :- रा...