Friday, July 12, 2024

  वृत्त क्र. 582

वाहनांच्या योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरणाच्या विलंब शुल्क आकारण्यास स्थगिती

नांदेड दि. 12 :- शासनाने 11 जुलै 2024 रोजीच्या निर्देशाद्वारे योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरणासाठी येणाऱ्या 15 वर्षाच्या आतील सर्व परिवहन वाहनांचे योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरणास विलंब झाल्यानंतर प्रतिदिन रुपये 50 रुपये इतेक विलंब शुल्क आकारण्याच्या कार्यवाहीस पुढील आदेशापर्यत स्थगिती दिली आहे. तरी सर्व वाहनधारकांनी याची नोंद घ्यावी व आपली वाहने योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरणासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयात सादर करावीत, असे प्रादेशिक परिवहन अधिकारी, नांदेड यांनी कळविले आहे.

वाहनांचे योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरणाचे विलंब शुल्क प्रतिदिन 50 रुपये आकारण्याची कार्यवाही सुरु करण्यात आली होती. सदर विलंब शुल्क माफ करणे / विलंब शुल्काच्या आकारणीमधून सूट देण्याबाबत ऑटोरिक्षा-टॅक्सी चालक संघटना तसेच विविध परिवहन संवर्गातील वाहन धारकांच्या संघटना यांच्याकडून शासनाकडे निवेदने प्राप्त झाली होती.

शासनाने वाहनधारक व विविध संघटना यांच्या निवेदनाचा व मागणीचा सहानुभूतीपुर्वक विचार करुन मुख्यमंत्री यांनी या प्रस्तावास मान्यता दिली. त्यास अनुसरुन परिवहन मंत्री यांनी 11 जुलै 2024 रोजी विधानसभा सभागृहात निवेदनाद्वारे 15 वर्षाच्या आतील सर्व परिवहन वाहनांचे योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरणास विलंब झाल्यानंतर प्रतिदिन रुपये 50 रुपये एवढे विलंब शुल्क आकारण्याच्या कार्यवाहीस पुढील आदेश होईपर्यत स्थगिती देण्याची घोषणा केली आहे.
00000

No comments:

Post a Comment

  वृत्त  क्र.  112 राज्यमंत्री मेघना बोर्डीकर साकोरे आज नांदेडमध्ये   जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक   नांदेड दि. 27 जानेवारी :- रा...