Friday, July 12, 2024

 वृत्त क्र. 581 

'सिईओताई 'लाडक्या बहिणीं 'च्या मदतीला पोहचाताहेत शेतशिवारात 

नांदेड दि. 12 जुलै : एखाद्या योजनेसाठी लोकांशी थेट जनसंपर्क ठेवणेरोज येणाऱ्या अडचणीवर मात करणेत्यातून अधिक सुलभ अधिक सहज सोपी योजना व्हावीयासाठी प्रयत्न करण्याचा प्रयोग नांदेड जिल्ह्यात होत आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सिईओ) मीनल करणवाल या मुख्यमंत्री माझी बहिण योजनेसाठी दररोज थेट लाभार्थी भगिनींशी जिल्हाभर संपर्क साधत आहेत.

 

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत जिल्ह्यामध्ये पात्र ठरणाऱ्या सर्व महिलांना या योजनेची माहिती व्हावी यासाठी प्रशासन कसोशीने प्रयत्न करत आहे. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांची यासंदर्भात दररोज महिला व बालविकास विभाग व अन्य सर्व संबंधित विभागासोबत सकाळी साडेदहाला बैठक होते. आणि त्यानंतर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांचा जिल्हाभर प्रवास सुरू होतो. कधी थेट शिवारात तर शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊनप्रत्यक्ष कॅम्पला भेटी देऊनप्रत्यक्ष लाभार्थ्यांची चर्चा करूनसिईओ मॅडम ही योजना सामान्य लाभार्थ्यांना समजावून सांगत आहे. त्यानंतर रोज सायंकाळी साडेसहा वाजता जिल्हा परिषदेमध्ये सुद्धा आढावा बैठक घेतली जात आहे.

 

दर महिन्याला दीड हजार रुपये आणि वर्षाला 18 हजार रुपये देणारी ही योजना राज्य शासनाने नुकतीच सुरू केली आहे. या योजनेचा ग्रामीण व शहरी भागावर मोठा प्रभाव दिसून येत आहे. महिला मोठ्या संख्येने या योजनेत सहभागी होण्यासाठी आवश्यक कागदपत्रे जमविण्याच्या मागे लागल्या आहेत. प्रशासकीय यंत्रणा ही त्यांना यासाठी साथ देत आहेत. मात्र काही ठिकाणी काही अडचणी तयार होतात. काही ठिकाणी अशिक्षित महिलांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन अडवणूक केली जात आहे. मात्र या सगळ्या बाबी रोज जनतेमध्ये जाऊन त्या त्या फीडबॅकचा दुसऱ्या दिवशी बैठकीत चर्चेला आणून ही योजना अधिक सुलभ अधिक सुकर व्हावी यासाठी ही धडपड लक्षवेधी आहे.

 

आतापर्यंत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी अनेक ठिकाणी भेटी  दिल्या. कासारखेडा ता. नांदेड येथील ग्रामपंचायतीस भेट दिलीअडचणी जाणून घेतल्या. एवढेच नव्हे तर कर्मचारी आणि महिलांना फॉर्म भरण्यास मदत ही केली.

 

परवा 10 जुलै देगलूर तालुक्यात त्यांनी तालुका दौऱ्यादरम्यान खुशावाडी येथील शेताच्या बांधावर जाऊन तेथील शेतकरी महिलांशी चर्चा केली. शेतात काम करणाऱ्या महिलांनी शेतीवाडीच्या ऐन पेरणीच्या लगबगीमध्ये या योजनेकडे दुर्लक्ष करू नये म्हणून त्यांनी माहिती जाणून घेतली. प्रत्येक कामकरी महिलेला याचा लाभ भेटला पाहिजे अशा सूचना त्यांनी नंतर जिल्हा परिषदेच्या संपूर्ण यंत्रणेला केल्या आहेत.

 

आज 12 जुलैला येरगी देगलूर येथे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसंदर्भात शिबिर लावण्यात आले होते. 100 महिलांसमवेत त्यांनी यावेळी संपर्क साधला व त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.

 

त्यानंतर त्यांनी ग्रामपंचायत कार्यालय मांजरम नायगाव येथील सुरू असलेल्या शिबिराला भेट दिली. जास्तीत जास्त लाभार्थींचे फॉर्म भरण्यात यावेयाकरिता ग्रामस्थांशी संवाद साधून त्यांना आवाहन केले. सनदी अधिकाऱ्याने एखाद्या योजनेच्या लाभ मिळावायासाठी नेमका कोणता जनसंपर्क केला पाहिजे याचा वस्तूपाठ यानिमित्ताने निर्माण होत आहे.

0000












No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...