Friday, July 12, 2024

 वृत्त क्र. 589 

मुख्यमंत्री वयोश्री योजना

लाभार्थ्यांना अर्ज करण्याचे आवाहन

 

नांदेड, दि. 12 जुलै :- राज्यातील 65 वर्षे वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमान परत्वेयोणाऱ्या अपंगत्व, अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने/ उपकरणे उदा : चष्मा, श्रवणयंत्र, ट्रायपॉड, स्टिक व्हिल चेअर, फोल्डिंग वॉकर, कमोड खुर्ची, नि-ब्रेस,  लंबर बेल्ट, सर्वाइकल कॉलर इत्यादी.  खरेदी करण्याकरीता राज्य शासनाने  "मुख्यमंत्री वयोश्री योजना" शासन निर्णयान्वये सुरु केली आहे. पात्र रक्कम 3 हजार रुपये पर्यंतची रक्कम साहित्य खरेदीसाठी महाडिबीटीद्वारे त्यांचे बँक खात्यात रक्कम जमा करण्यात येणार आहे. लाभार्थ्यांना सदर योजनेचा लाभ मिळण्यासाठी दिनांक 10 ते 25 जुलै 2024 या कालावधीत सहाय्यक आयुक्त समाज कल्याण नांदेड  येथे अर्ज सादर करावेत.

 

अर्जासोबत पुढील कागदपत्रे आवश्यक

 

दिनांक 31 डिसेंबर 2023 अखेर पर्यंत वयाची 65 वर्षे पुर्ण केलेली असावे. आधार कार्ड / मतदान कार्ड. राष्ट्रीय सामाजिक सहाय्य कार्यक्रमांतर्गत इंदिरा गांधी, राष्ट्रीय वृध्दापकाळ निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत किंवा राज्य / केंद्रशासित सरकारच्या इतर कोणत्याही पेन्शन योजनेअंतर्गत वृध्दापकाळ निवृत्तीवेतन मिळाल्याचा पुरावा  किंवा तहसीलदार किंवा तत्सम सक्षम अधिकारी यांनी निर्गमित केलेले ज्येष्ठ नागरीक प्रमाणपत्र जोडणे आवश्यक. आधार संलग्न राष्ट्रीयकृत बँकेतील बचत  बँक खात्याचे बँक पासबुक झेरॉक्स. पासपोर्ट आकाराचे 2 फोटो. उत्पन्नाचे प्रमाणपत्र. (लाभार्थ्याचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न रुपये 2 लाखाच्या आत असावे.) 

 

स्वयं-घोषणापत्र -  CPSU द्वारे लाभार्थ्यांकडून सदरील प्राप्त रक्कम नेमून दिलेल्या प्रयोजनाकरिता वापरण्यात येईल. असे स्वयंघोषणापत्र प्राप्त करुन घ्यावे तसेच राष्ट्रीय योजनेचा / केंद्र पुरस्कृत समकक्ष योजनेचा मागील 3 वर्षात लाभ घेतला नसल्याचे देखील स्वयंघोषणापत्र  नमुद करण्यात यावे. वर नमूद साधनांपैकी पैकी कोणते साहित्य खरेदी करणार याची  माहिती अर्जात नमुद करणे.

 

वरिल कागदपत्रे पुर्ण करणारे लाभार्थ्यांनी 25 जुलै 2024 पर्यंत सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, ग्यानमाता शाळेसमोर , नांदेडयेथे परिपूर्ण  अर्ज सादर करावेत. तसेच या पूर्वी अर्ज दाखल केलेल्या लाभार्थ्यांनी उपरोक्त प्रमाणे कागदपत्रांची पूर्तता करणे करीत कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन सहायक आयुक्त समाज कल्याण कार्यालयाने केले आहे.

00000

No comments:

Post a Comment

  वृत्त  क्र.  112 राज्यमंत्री मेघना बोर्डीकर साकोरे आज नांदेडमध्ये   जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक   नांदेड दि. 27 जानेवारी :- रा...