Friday, July 12, 2024

 'मुख्यमंत्री - माझी लाडकी बहीण' योजनेचा विभागीय आयुक्तांकडून आढावा

योजनेची पारदर्शक व गतिमान अंमलबजावणी करा

-विभागीय आयुक्त दिलीप गावडे

 

छत्रपती संभाजीनगर, दि. 12 : राज्य शासनाने 'मुख्यमंत्री -माझी लाडकी बहीण' योजना संपूर्ण राज्यात सुरु केली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी विभागात सर्वत्र नाव नोंदणी व अर्ज सादर करण्यासाठी महिलांचा प्रतिसाद दिसून येत आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक दाखल्यांसाठी महिलांना सहकार्य करावे तसचे विभागातील प्रत्येक जिल्ह्यात योजनेची पारदर्शक व गतिमान अंमलबजावणी करा, असे निर्देश विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी यंत्रणेला दिले.

 

विभागीय आयुक्त कार्यालयात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’ बाबत विभागीय आयुक्त श्री गावडे यांनी आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी उपायुक्त सुरेश बेदमुथा, नगरपालिका प्रशासन सहआयुक्त  देविदास टेकाळे, महिला व बाल विकास विभागाचे प्रभारी उपायुक्त गणेश पुंगळे उपस्थित होते.

 

'मुख्यमंत्री - माझी लाडकी बहीण' योजनेसाठी आवश्यक प्रमाणपत्रे देणे, अर्ज भरुन घेणे यासह या संपूर्ण प्रक्रियेत महिलांची अडवणूक केल्यास, प्रक्रियेत दिरंगाई केल्यास किंवा योजनेच्या लाभासाठी महिलांकडून पैशांची मागणी करीत असल्याचे निदर्शनास आल्यास

याबाबतची तक्रार आपल्या जिल्हाधिकाऱ्यांकडे करावी. योजनेचे संनियंत्रण करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. योजनेच्या अंमलबजावणीत त्यांची भूमिका महत्त्वाची राहणार असल्याचे विभागीय आयुक्त श्री गावडे म्हणाले. त्याचबरोबर योजनेसंदर्भातील कागदपत्रे उपलब्ध करुन देणे किंवा फॉर्म भरुन देण्याचे निमित्त करुन निर्माण होणारे दलाल अजिबात खपवून घेतले जाणार नाहीत. असेही त्यांनी सांगितले.

 

योजनेसाठी नावनोंदणी, अर्ज करणे आदी कामांसाठी मुदत ३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत वाढविण्यात आली आहे. महिलांना नोंदणीसाठी रांगा लावण्याची गरज पडणार नाही, यादृष्टीने नियोजन करावे. महिलांची कोणत्याही कारणास्तव अडवणूक होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी, अशा सूचना श्री. गावडे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

******



No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...