Sunday, March 8, 2020


महिला दिन उद्योजकता मार्गदर्शन केंद्रात साजरा   
  
नांदेड,दि. 8 :- जिल्हा कौशल्य विकास, रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्र नांदेड येथे जागतिक महिला दिन आज साजरा करण्यात आला. या कार्यालयामार्फत सुशिक्षित बेरोजगार महिलांसाठी ग्रंथालय योजनेतंर्गत मोफत पुस्तके, वर्तमानपत्रे उपलब्ध असुन त्या संधीचा फायदा घेऊन शासकीय नोकरीस यशस्वी झालेल्या महिलांचा या कार्यालयामार्फत सन्मानचिन्ह पुष्प गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
तसेच यापुढेही या ग्रंथालयाचा लाभ घेऊन मोठया पदावरील नोकरी प्राप्त करुन घेण्याचे आवाहन या कार्यालयाचे  प्र. सो. खंदारे, सहायक आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार उद्योजकता, नांदेड यांनी केले.
यावेळी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्रीमती सु.प्र.पाटील यांनी केली तर समारोप समारंभ अ.गो.कदम यांनी केले.
00000


No comments:

Post a Comment

  वृत्त क्र. 1133 नांदेड जिल्ह्यातील 9 विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीत  भाजपचे 5, शिवसेनेचे 3 तर राष्ट्रवादी काँग्रेसचा 1 उमेदवार विजयी  नां...