Monday, March 9, 2020


भारत स्टेज - 4 मानांकनाची वाहने
31 मार्च पूर्वी नोंदणी झाल्यास
रस्त्यावर वापरता येणार नाही  
            नांदेड, दि. 9 :- भारत स्टेज - 4 मानांकनाची वाहने 31 मार्च 2020 पूर्वी नोंदणी झाल्यास ती रस्त्यावर वापरता येणार नाही. त्यामुळे 31 मार्च किंवा त्यापूर्वी होणाऱ्या नोंदणीची गर्दी लक्षात घेता ऐनवेळी कागदपत्रात काही त्रुटी उद्भवण्याची शक्यता असल्याने वाहन मालकांनी त्यांची वाहने ताबडतोब नोंदणीसाठी सादर करावीत, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड यांनी केले आहे.  
नवी दिल्ली सर्वोच्च न्यायालयात दाखल जनहित याचिकमध्ये न्यायालयाने 1  एप्रिल 2020 नंतर  देशभरात भारत स्टेज- 6 मानांकन नसलेली वाहने विक्री नोंदणी करण्यास मनाई केली आहे. भारत स्टेज- 4 मानांकनाची वाहने खरेदी केली असल्यास त्यांची नोंदणी मंगळवार 31 मार्च 2020 पूर्वी होऊन त्यांना नोंदणी क्रमांक देणे आवश्यक आहे.
यापूर्वी खरेदी केलेल्या काही वाहनांच्याबाबत कागदपत्रातील त्रुटीमळे अथवा अन्य कोणत्याही कारणाने नोंदणीची प्रक्रिया अपूर्ण राहिली असल्याची शक्यता आहे. केवळ शुल्क कर भरल्याने व्हीआयपी क्रमांकाचा शुल्क भरल्याने अथवा वाहन मोटार वाहन निरीक्षकाकडे तपासणीसाठी सादर केल्यामळे नोंदणी प्रक्रिया पूर्ण होत नाही तर वाहनास नोंदणी क्रमांक जारी झाल्यावरच ही प्रक्रीया कायदेशीररीत्या पूर्ण होते.
सर्व वाहनधारकांना त्यांच्या मालकीची वाहने नोंदणी झाली असल्याबाबतची  खात्री करावी. ज्या वाहन मालकांना वाहनाचे मूळ आरसी बुक पुस्तक प्राप्त झाले नाही त्यांनी त्यांचा वाहन क्रमांक खालील वेबसाईटवर तपासून घ्यावा. www.parivahan.gov.in------> Online Services-----> know your vehicle details या वेबसाईटवर वाहनाची माहिती उपलब्ध नसल्यास त्वरीत वाहन विक्रेत्याकडे अथवा नजीकच्या आरटीओ कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड यांनी केले आहे.
00000

No comments:

Post a Comment

 लक्षवेध :नांदेड जिल्ह्यातील विधानसभा निहाय मतदानाची अंदाजीत अंतिम आकडेवारी लक्षवेध : नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीतील अंदाजीत अंतिम आकडेवारी वि...