मास्क,
पी.पी.ई. किटची विक्री डॉक्टरांचे
चिठ्ठीवर,
विक्री बिलाद्वारे करण्याची सुचना
गरज असल्याशिवाय
मास्कची खरेदी, अनावश्यक साठवणूक करु नये
नांदेड, दि. 9 :- सध्या मुख्य करुन चिनमध्ये फैलावलेला कोरोना
सदृश्य आजाराने थैमान घातले असून त्यात रुग्णांचा मृत्यू झाल्याचे दिसून येत आहे.
त्याअनुषंगाने भारत सरकार व महाराष्ट्र शासन यांनी सदर आजाराचा प्रादुर्भाव व
फैलाव होवू नये म्हणून काही प्रतिबंधीत उपाय योजले आहेत. त्याचाच भाग म्हणून अन्न
व औषध प्रशासन विभागाने सुद्धा उपचाराकरीता तसेच प्रतिबंधाकरीता वापरात येणारी
पी.पी.ई. किट व एन 95 मास्क, इतर वस्तु यांची उपलब्धता व काळाबाजार रोखण्यासाठी
परिपत्रक काढून राज्यातील औषध विक्रेत्यांना एन 95 मास्क व पी.पी.ई. किट यांची
विक्री डॉक्टरांचे चिठ्ठीवर व विक्री बिलाद्वारे करण्याचे सुचना दिल्या आहेत.
त्याअनुषंगाने
शनिवार 7 मार्च 2020 रोजी औषधी भवन येथे नांदेड जिल्ह्यातील घाऊक औषधे विक्रेते व
सर्जिकल वस्तुंचे विक्रेते यांची बैठक नांदेड जिल्ह्याचे औषध निरीक्षक मा. ज.
निमसे यांनी घेतली. या बैठकीत श्री. निमसे यांनी एन 95 मास्क व पी.पी.ई. किटची
विक्री डॉक्टरांचे चिठ्ठीवर व विक्री बिलाद्वारे करण्याच्या सुचना दिल्या. त्याची
पडताळणी करण्यासाठी अचानक औषध विक्रेत्यांच्या तपासण्या करण्यात येत असल्याचे
सांगितले. कोणीही औषध विक्रेते एन 95 मास्क व पी.पी.ई. किटची विक्री डॉक्टरांचे
चिठ्ठीवर व विक्री बिलाद्वारे करत असल्याचे आढळून आल्यास त्यांचा परवाना रद्द
करण्यात येणार असल्याचे सांगितले. ग्राहकांनी सुद्धा गरज असले शिवाय मास्कची खरेदी
करु नये व अनावश्यक त्याची साठवणूक करु नये, असे आवाहन केले. गरज भास्ल्यास
डॉक्टरांचा सल्ला घेवून व चिठ्ठीद्वारे खरेदी बिलासह मास्कची खरेदी करावी.
औषध
विक्रेते छापील किंमतीपेक्षा जास्त किंमती आकारत असल्यास त्याबाबत प्रशासनाची
संपर्क करावा. मास्कची व पी.पी.ई किटची उपलब्धता करुन ठेवण्याच्या सुचना बैठकीत
देण्यात आल्या, अशी माहिती सहायक आयुक्त (औषधे) अन्न व औषध प्रशासन नांदेड यांनी दिली
आहे.
000000
No comments:
Post a Comment