Sunday, March 8, 2020


आरोग्य सेवा अधिक बळकट
करण्याची शासनाची भुमिका
-         पालकमंत्री अशोक चव्हाण

नांदेड दि. 8 :- आरोग्य सेवा अधिक बळकट करण्यासाठी आवश्यक ती मदत करण्याची शासनाची भुमिका आहे, असे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी केले आहे.
जागतिक महिला दिनानिमित्त नांदेड शिवाजीनगर महानगरपालिका दवाखाना येथे महिला आरोग्य तपासणी शिबीराच्या उद्घाटन प्रसंगी पालकमंत्री श्री. चव्हाण बोलत होते.     
यावेळी महापौर सौ. दिक्षा धबाले, आमदार अमरनाथ राजूरकर, आमदार मोहनराव हंबर्डे, माजी राज्यमंत्री डी. पी. सावंत, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, उपमहापौर सतिश देशमुख, स्थायी समिती सभापती अमितसिंह तेहरा, दिपकसिंह रावत, विरेंद्रसिंह गाडीवाले, खालसा प्रकाशकौर सुरजितसिंघ, उपसभापती डॉ. आशिया कौसर मो. हबीब यांची प्रमुख उपस्थिती होती.
पालकमंत्री अशोक चव्हाण म्हणाले, जागतिक महिला दिनानिमित्त नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेने महिलांसाठी रोग निदान शिबिराचा चांगला उपक्रम हाती घेतला आहे. आरोग्य सेवा अतिशय महत्वाची आहे. नागरिकांसाठी उभारण्यात आलेल्या पायाभुत सुविधेचा चांगला वापर झाला पाहिजे. या सुविधा देण्यासाठी कायम आपण प्रयत्नशील राहिलो आहे. या दवाखाण्याचा परिसर हा गजबजलेला असून येथे आरोग्याची उत्तम सेवा देण्यासाठी कायमस्वरुपी मनुष्यबळ उपलब्ध राहिले पाहिजे. देशात कर्करोगाचे प्रमाण वाढत चालले आहे. कर्करोगाचे निदान खर्चीक असले तरी सुरवातीला या रोगाचे निदान झाले तर यात यश मिळते. गरिबांना तातडीच्या आरोग्य सेवेसाठी मदत करण्याचा हा प्रयत्न असून या शिबिरात गरजू व्यक्तींना आरोग्य तपासणीचा लाभ मिळावून त्यांना चांगले आरोग्य मिळाले पाहिजे, यासाठी सर्वांचे प्रयत्न महत्वाचे ठरतील, असेही पालकमंत्री श्री. चव्हाण यांनी स्पष्ट केले.
यावेळी महानगरपालिकेचे पदाधिकारी, वैद्यकीय अधिकारी, महिला, कर्मचारी, नागरिक, रुग्ण आदींची उपस्थिती होती.
00000

No comments:

Post a Comment

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...