Sunday, March 8, 2020


महिलांच्या सबलीकरणासाठी राज्य शासन सदैव प्रयत्नशील 
-         पालकमंत्री अशोक चव्हाण
नांदेड,दि.8:-  महिला बचत गटांच्या माध्यमातून महिला सक्षमीकरण, सबलीकरण, गोर-गरिब, ग्रामीण भागातील महिलांना त्यांच्या दैनंदिन अडचणी सोडविण्याचा शासन प्रयत्न करीत आहे. या माध्यमातून महिलांना मदत मिळत असून महिलांच्या सबलीकरणासाठी राज्य शासन सदैव प्रयत्नशील आहे, असे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी केले आहे.    
            जागतिक महिला दिनानिमित्त जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाच्यावतीने जागतिक महिला दिनाच्या औचित्याने बेटी बचाओ,बेटी पढाओ कार्यक्रम तसेच एकात्मिक बालविकास सेवा योजनेतंर्गत सन 2018-2019 या वर्षात उत्कृष्ट काम करणाऱ्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना यशोदामाता पुरस्कार-2020 वितरण सोहळा येथील भक्ती लॉन्स येथे आज आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून यावेळी पालकमंत्री  श्री. चव्हाण बोलत होते.  

यावेळी आमदार अमर राजूरकर, आमदार मोहन हंबर्डे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा श्रीमती मंगाराणी अंबुलगेकर, नांदेड वाघाळा महानगरपालिकेच्या महापौर श्रीमती दिक्षाताई धबाले, माजी राज्यमंत्री डी. पी. सावंत, महिला व बाल कल्याण सभापती श्रीमती सुशिलाताई बेटमोगरकर, सभापती सती देशमुख तरोडेकर, जिल्हा परिषदेचे शिक्षण व बांधकाम सभापती संजय बेळगे, कृषी व पशुसंवर्धन सभापती बाळासाहेब पाटील, समाज कल्याण सभापती रामराव नाईक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे, बांधकाम सभापती संजय देवके तसेच जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका, मदतनीस, पत्रकार, महिला बचत गटाच्या सदस्या, अधिकारी - कर्मचारी आदिंची उपस्थिती होती.
सुरुवातीला क्रांतीज्योती सावित्रिबाई फुले व कै. डॉ. शंकरराव चव्हाण यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन दिप प्रज्वलनाने कार्यक्रमाचे उद्घाटन पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते झाले.
जागतिक महिला दिनानिमित्त महिलांना शुभेच्छा देवून पालकमंत्री अशोक चव्हाण म्हणाले की, देशातील पहिल्या महिला राष्ट्रपती म्हणून प्रतिभाताई पाटील या होत्या. तर सावित्रीबाई फुले, झाशीची राणी,                         डॉ. बाबासाहेब  आंबेडकर या समाज सुधारकांची इतिहासात सुवर्ण अक्षरांनी नोंद घेतली आहे.  
अंगणवाडी सेविका, मदतनीस यांचे  महिला व बालविकासासाठी मोलाचे काम आहे. महिलांची चळवळ राज्यभर मोठ्या ताकदीने उभी असून त्यांना अधिक प्रोत्साहन देण्याची गरज आहे, त्यासाठी शासन कटिबध्द आहे.
राज्यात महर्षी महादेव गोविंद रानडे, महर्षी धोंडो केशव कर्वे, सावित्रीबाई फुले, महात्मा फुले,                   डॉ. बाबासाहेब आंबेडकर अशा अनेक समाज सुधारकांचे शिक्षणामध्ये महत्वाचे योगदान आहे. त्यांच्या या प्रयत्नामुळे आज महिला शिक्षणात अग्रेसर आहेत.  
स्त्रीभृण हत्या मानवतेला कलंक असून स्त्रीचा सन्मान प्रत्येकानी ठेवला पाहिजे. अंगणवाडी सेविकांच्या इमारतीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी जिल्हा परिषदेने आराखड्याचे नियोजन करावे. सुविधा उपलब्ध नाहीत अशा अतिदुर्गम भागातील इमारतीसाठी प्रयत्न करण्यात येतील. तसेच शेतकरी आत्महत्या, समाजातील गरीब वर्गाला न्याय देण्याचे काम करावे लागणार आहे. महिला आपल्या क्षेत्रात आत्मियतेने काम करीत असतात, असे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी यावेळी नमुद केले. 
जिल्हा परिषदेच्या  योजनेचा निधी सर्वच खर्ची करण्यात यावा. जिल्हा परिषदेच्या योजनांचा लाभ सर्वसामान्यांना मिळाला पाहिजे. जिल्ह्यातील अवैध व्यवसाय बंद करावेत त्यादृष्टीने जिल्हा प्रशासनाने प्रयत्न करावेत.
जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर यांनी महिलांनी आपल्या क्षेत्रात सक्षम होवून स्वत:च्या पायावर राहिले पाहिजे. महिलांनी शिक्षणापासून वंचित राहू नये, असे सांगितले.  
महिला व बाल विकास समितीच्या सभापती सुशिला पाटील बेटमोगरेकर यांनीही मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपमुख्य कार्यकारी अधिकारी एस.व्ही. शिंगणे यांनी केले.  
            एकात्मिक बाल विकास सेवा योजनेत यशोदामाता पुरस्कारासाठी पात्र 80 कर्मचाऱ्यांना या पुरस्काराचे वितरण करण्यात आले.    यावेळी उपस्थितांना जागतिक महिला दिनानिमित्त बेटी बचाओ, बेटी पढाओ बाबतची शपथ देण्यात आली.
0000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...