Sunday, March 8, 2020


महिलांनी आरोग्य सांभाळून नोकरी करा
-         जिल्हाधिकारी डॉ. विपीन  
नांदेड,दि. 8 :- जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आज सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रागंणात महिला दिन च्या ध्वजाचे ध्वजारोहण उपजिल्हाधिकारी श्रीमती संतोषी देवकुळे यांच्या हस्ते करण्यांत आले. त्यानंतर जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी सर्व महिलांना महिला दिनाची शपथ वचनबध्द करवून घेतली. त्यानंतर स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना (NSS) च्या अमोल सरोदो व इतर कलाकार यांनी मन हेलावून टाकणारे बेटी बचाओ बेटी पढाओ हे पथनाट्य सादर केले. या महिला दिनानिमित्त  डॉ. विपीन यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात Sanitary Vending Machine बसवून महिलांना आरोग्य विषयक जागरूकतेची भेट दिली.
           
त्यानंतर बचत भवन येथे जिल्हाधिकारी डॉ. विपीन, अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.सचिन खल्लाळ, उपजिल्हाधिकारी संतोषी देवकुळे यांच्या हस्ते दिप प्रज्वलन करून पुढील कार्यक्रम घेण्यांत आला. सुरूवातीस डॉ.सारिका धोंडे यांचे महिलांच्या आरोग्य विषयक जागरूकते बाबत व्याख्यान झाले. त्यानंतर डॉ.लेमिना बिरगाळे पाटील यांचे योग व आहार या विषयावर व्याख्यान झाले. त्यानंतर महसूल विभागातील लिपिक, अव्वल कारकून, तलाठी, मंडळ अधिकारी, शिपाई, कोतवाल या संवर्गातील उत्कृष्ट काम करणाऱ्या महिलांचा जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांच्या हस्ते सत्कार करून गौरविण्यात आले. नायब तहसीलदार उर्मिला कुलकर्णी, जिल्हाधिकारी कार्यालयातील अश्विनी केंद्रे, मंजूषा रापतवार, कल्पना क्षिरसागर, ज्योती बाऱ्हाळीकर, माधुरी शेळके, डॉ.स्वाती अलोणे,  स्वाती पेद्देवाड, विद्या सुरूंगवाड, अनुराधा नरवाडे, वंदना गवळी, माधुरी ठाकूर, कल्पना नगराळे, पायल कदम, रूपाली बंगाळे, मनिषा मोहिते, मीना सोलापूरे, भाग्यश्री आणेराव, शिल्पा बोकन तसेच उपविभाग नांदेड मधून आर.एस.वाठोरे, एस.एन.बेती, पी.एम.आठवले, एस.एस.गंगातीटे, शितल यरगलवाड, आरती सारंग उपविभाग किनवट मधून भाग्यश्री तेलंग, दिपाली पिंजरकर, शिवकांता होणवडजकर, उपविभाग कंधार मधून वंदना शिंदे, राजश्री जोंधळे, सुरेखा सुरूंगवाड, जहरूनीसा बेगम, जिलानी खान, उपविभाग धर्माबाद मधून गोपीनवार, सईदा फीरदोस, अनुपमा मुधोळकर, सुजाता बेंद्रीकर, उपविभाग भोकर मधून एस.एस.कुसळे, आशामती राऊत, प्रियंका कापसे, ज्योती हुंडेकर, भंडारे ललीता,वनिता औसेकर,उपविभाग देगलूर मधून मुंडे, पुजा इंगळे, यशोदा बेळगे, के.स.जुरावाड,उपविभाग बिलोली मधून जे.एम.जिगळे, व्ही.जी.मकरंद, एस.बी.पांपटवार, विशाखा रायबोले, उपविभाग हदगांव मधून जी.एस.सूर्यवंशी, के.वाय.पोपलवार, के.एल.कावळे, एस.यु.कल्याणकर या महिलांचा समावेश होता. नांदेड तालुक्यातील प्रातिनिधिक स्वरूपात महिलांना EPIC (मतदान ओळखपत्र) वाटप करण्यांत आले. राष्ट्रीय कुटूंब अर्थ सहाय्य योजनेंतर्गत लता रजनीकांत सदावर्ते, लिंबगांव व शिला गणेश श्रीमंगले सुगांव बु. यांना मा.डॉ.विपीन यांच्या हस्ते धनादेश देण्यांत आला.
            त्यानंतर महिलांचे उद्बोधकपूर्ण गीत मीना सोलापूरे, ज्योती बार्‍हाळीकर, मंजूषा रापतवार, अश्विनी केंद्रे यांनी गायन केले. माधुरी शेळके, स्वाती पेद्देवा़ड, डॉ.स्वाती अलोणे, यांनी अभ्यासपूर्ण मनोगत व्यक्त केले.
             अपर जिल्हाधिकारी परदेशी यांनी महिलां बाबत पुरूषांना आदर करणे त्यांना समानतेची वागणूक देणे याबाबतचे संस्कार घराघरातून केले पाहिजेत. महिलांकडे पाहण्याचा दृष्टीकोन मानवतेचा असला पाहिजे असे प्रतिपादन केले.तसेच वाढत्या गुन्हेगारीच्या समाजात वावरतांना महिलांनी स्व संरक्षण करणे त्यासाठी रणरागिणी होणे, स्वावलंबी होणे गरजेचे आहे असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.सचिन खल्लाळ यांनी केले.
            शेवटी जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी अध्यक्षीय भाषणात महिला या खरोखरच समानतेच्या, मानवतेच्या दावेदार आहेत. महिलांनी समाजात वावरतांना निर्भिडपणे राहिले पाहिजे यासाठी स्वत:चे आरोग्य सांभाळले पाहिजे प्रचंड उर्मी ठेवून काम केले पाहिजे, जेणे करून कुटूंबांचे अर्थाजन व नोकरी करणे सुखकर होईल. महिला ह्या नव्यान्नव टक्के कुटूंबांची जबाबदारी स्वत: हून स्विकारतात, पार पाडतात तेंव्हा त्यांच्या ह्या कर्तृत्वाला, ममतेला सलाम सांगून सर्व महिलांना सन्मानित केले.
            सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक तहसीलदार डॉ.मृणाल जाधव यांनी केले तर सूत्रसंचालन तहसीलदार उज्वला पांगरकर व तहसीलदार वैशाली पाटील यांनी केले. तर आभार नायब तहसीलदार संजीवनी मुपडे यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व महिला कर्मचार्‍यांनी उस्त्फुर्त सहभाग घेतला व मीना सोलापूरे, अव्वल कारकून यांनी विशेष परिश्रम घेतले. 
00000

No comments:

Post a Comment

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...