Thursday, March 12, 2020


नामनिर्देशनपत्रासोबत जात पडताळणी समितीकडे
सादर केलेल्‍या अर्जाची पोच पावती, हमीपत्र सादर करण्याची मुभा 
नांदेड, दि. 12 :- एप्रिल ते जू2020 या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्‍या सार्वत्रिक        निवडणूकीसाठी नामनिर्देशनपत्रासोबत जात पडताळणी समितीकडे सादर केलेल्‍या अर्जाची पोच पावती व हमीपत्र सादर करण्याची मुभा उमेदवारांना दिली आहे.  
राज्‍य निवडणुक आयोगाने सन 2020 चा महाराष्‍ट्र अधिनियम क्रमा4 दि. 11 मार्च 2020 अधिनियमानुसार राज्‍य निवडणुक आयोगाने जाहीर केलेल्‍या निवडणुक कार्यक्रमानुसार सार्वत्रिक किंवा पोटनिवडणुक कार्यक्रमांसाठी नामनिर्देशनपत्र दाखल करण्‍याचा शेवटचा दिनांक हा 28 फेब्रुवारी 2021 किंवा त्‍यापुर्वी असेल, त्‍याबाबतीत नामनिर्देशनपत्रासोबत वैधता प्रमाणपत्र देण्‍यासाठी पडताळणी समितीकडे सादर केलेल्‍या अर्जाची सत्‍यप्रत किंवा पडताळणी समितीकडे अर्ज केला असल्‍याबाबतचा अन्‍य कोणताही पुरावा आणि निवडून आल्‍याच्‍या दिनांकापासुन 12 महिन्‍यांच्‍या आत पडताळणी समितीने दिलेले वैधता प्रमाणपत्र सादर करील, असे हमीपत्र सादर करण्‍याची मुभा उमेदवारांना दिली आहे. अशी माहिती उपजिल्हाधिकारी (सामान्य) जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड यांनी दिली आहे.
000000

No comments:

Post a Comment

वृत्त क्र.   पालकमंत्री अतुल सावे यांचा नांदेड दौरा   नांदेड दि. 24 जानेवारी :- राज्याचे इतर मागास बहूजन कल्याण , दूग्धविकास , अपारंपारि...