Thursday, March 12, 2020


ग्रामपंचायत निवडणूकीसाठी
वैधता प्रमाणपत्र, हमीपत्र सादर करण्याची मुभा
-         तहसिलदार नांदेड  
नांदेड, दि. 12 :- ग्रामपंचायतींच्‍या सार्वत्रिक निवडणूकीसाठी उमेदवारांना नामदनिर्देशन पत्रासोबत वैधता प्रमाणपत्र देण्‍यासाठी पडताळणी समितीकडे सादर केलेल्‍या अर्जाची सत्‍यप्रत किंवा अर्ज केला असल्‍याचा अन्‍य कोणताही पुरावा आणि निवडून आल्‍याच्‍या दिनांकापासून 12 महिन्‍यांच्‍या आत पडताळणी समितीने दिलेले वैधता प्रमाणपत्र सादर करील, असे हमीपत्र सादर करण्‍याची मूभा उमदेवारांना दिली आहे. या झालेल्‍या बदलाची नोंद सर्व संबंधितांनी घ्‍यावी, असे आवाहन राज्‍य निवडणुक आयुक्‍ताने प्राधिकृत केलेले अधिकारी तथा तहसिलदार नांदेड यांनी केले आहे.  
राज्‍य निवडणूक आयोगाने नांदेड तालुक्‍यातील 24 ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. महाराष्‍ट्र ग्रामपंचायत अधिनियमाच्‍या कलम 10-1 अ मधील तरतुदीनुसार राखीव असलेल्‍या जागेसाठी निवडणुक लढविणाऱ्या इच्छुक असलेल्‍या प्रत्‍येक व्‍यक्‍तीने नामनिर्देशनपत्रा बरोबर सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले जातीचे प्रमाणपत्र व पडताळणी समितीने दिलेले वैधता प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य राहिल असे निर्देश दिले होते. परंतू सन 2020 चा महाराष्‍ट्र अधिनियम क्रमांक 4 दि. 11 मार्च 2020 अन्‍वये राज्‍य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्‍या निवडणूक कार्यक्रमानुसार ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2020 साठी निवडणूक लढविणाऱ्या इच्‍छूक उमेदवारांना नामदनिर्देशन पत्रासोबत वैधता प्रमाणपत्र देण्‍यासाठी पडताळणी समितीकडे सादर केलेल्‍या अर्जाची सत्‍यप्रत किंवा पडताळणी समितीकडे अर्ज केला असल्‍याबाबतचा अन्‍य कोणताही पुरावा आणि निवडून आल्‍याच्‍या दिनांकापासून 12 महिन्‍यांच्‍या आत पडताळणी समितीने दिलेले वैधता प्रमाणपत्र सादर करील, असे हमीपत्र सादर करण्‍यांची मूभा उमदेवारांना दिली आहे.या झालेल्‍या बदलाची नोंद सर्व संबंधितांनी घ्‍यावी, असे आवाहन राज्‍य निवडणुक आयुक्‍ताने प्राधिकृत केलेले अधिकारी तथा तहसिलदार नांदेड यांनी केले आहे.  
00000

No comments:

Post a Comment

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...