Thursday, March 12, 2020


ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक सुधारीत कार्यक्रम
नामनिर्देशनपत्र सादर करण्यास मुदतवाढ
नांदेड, दि. 12 :- ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकांसाठी नामनिर्देशनपत्र मागविण्याचा व सादर करण्याचा कालावधी सोमवार 16 मार्च 2020 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत वाढविण्यात आला आहे. सुधारीत निवडणूक कार्यक्रम पुढील प्रमाणे राहिल.
नामनिर्देशनपत्रे मागविण्याचा दिनांक व वेळ (नमुना अ अ मध्ये नमुद केलेले ठिकाणी) शुक्रवार 6 मार्च 2020 ते सोमवार 16 मार्च 2020 वेळ सकाळी 11 ते सायंकाळी 5 (शनिवार 14 मार्च व रविवार 15 मार्च 2020 वगळून). नामनिर्देशनपत्रे छाननी करण्याचा दिनांक व वेळ (नमुना अ अ मध्ये नमुद केलेल्या ठिकाणी)  मंगळवार 17 मार्च 2020 वेळ सकाळी 11 ते छाननी संपेपर्यंत. नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याचा अंतिम दिनांक व वेळ (नमुना अ अ मध्ये नमुद केलेल्या ठिकाणी)- गुरुवार 19 मार्च 2020 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत. निवडणूक चिन्ह नेमून देण्याचा तसेच अंतिमरित्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध करण्याचा दिनांक गुरुवार 19 मार्च 2020 रोजी दुपारी 3 वाजेनंतर. आवश्यक असल्यास मतदानाचा मंगळवार 31 मार्च 2020 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत (गडचिरोली जिल्ह्यासाठी 7.30 वा. पासून ते दुपारी 3 वाजेपर्यंत). मतमोजणीच्या दिनांक (मतमोजणीचे ठिकाण व वेळ जिल्हाधिकारी यांचे मान्यतेने तहसिलदार निश्चित करतील त्यानुसार राहिल) बुधवार 1 एप्रिल 2020. जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत निवडणूकीच्या निकालाची अधिसूचना प्रसिद्ध करण्याचा अंतिम दिनांक मंगळवार 7 एप्रिल 2020 पर्यंत राहील.  
दिनांक 14 मार्च व 15 मार्च 2020 या सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी अर्जदारांना नामनिर्देशनपत्र केवळ संगणक प्रणालीमध्ये भरण्याची सोय उपलब्ध राहिल, अशी माहिती राज्य निवडणूक आयोगाच्यावतीने उपजिल्हाधिकारी (सामान्य) नांदेड यांनी दिली आहे. याबाबत सर्व संबंधित निवडणूक अधिकारी व निवडणूक निर्णय अधिकारी यासह सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी, असेही आवाहन करण्यात आले आहे.
0000000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...