Thursday, January 2, 2020


प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत
पोर्टलवरील नाव आधार कार्डवरील
नावाप्रमाणे सुधारीत करण्याचे आवाहन

नांदेड, दि. 2 : प्रधानमंत्री किसान सन्‍मान निधी (PM-KISAN) योजनेअंतर्गत मिळणा-या सन्‍मान निधी रक्‍कमेचे  हप्‍ते सुरळित चालू राहण्‍यासाठी शेतकऱ्यांनी त्‍यांचे पोर्टलवरील नाव हे आधार कार्डवरील नावाप्रमाणे जवळच्‍या सेतु सुविधा / सीएससी केंद्र मार्फत अथवा स्‍वतः सुधारीत करण्‍याचे आवाहन नांदेड जिल्‍हा प्रशासनाने केले आहे.
कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍य व्‍यवसाय विभाग यांचे परिपत्रकान्‍वये शेतकऱ्यांना निश्‍चीत उत्‍पन्‍न मिळण्‍यासाठी प्रधानमंत्री किसान सन्‍मान निधी योजना सुरु करण्‍यात आली आहे. नांदेड जिल्‍हयातील 4 लाख 19 हजार 332 पात्र लाभार्थी शेतकरी कुटूंबाची माहिती अपलोड करण्‍याचे काम पुर्ण झाले आहे. लाभा‍र्थी कुटूंबाची माहिती अपलोड झालेल्या शेतक-यांना आजपर्यंत सन्‍मान निधी रक्‍कम हप्‍तेनिहाय मिळाली आहे.
            ज्‍या शेतकऱ्यांची पीएम किसान पोर्टलवरील नोंदणी ही आधार कार्डवरील नावाप्रमाणे नसेल त्‍यांचे पुढील हप्‍ते थांबविण्‍यात येणार आहेत. त्‍यामुळे पुढील हप्‍ते नियमित चालू राहण्‍यासाठी शेतकऱ्यांनी आधार कार्डवरील नावाप्रमाणे पीएम किसान पोर्टलवर आपले नावात सुधारणा करावी. यासाठी शेतकऱ्यांना जवळच्‍या सेतु सुविधा किंवा सीएससी केंद्रावर जावून नावात सुधारणा करण्‍याची सुविधा उपलब्ध करुन देण्‍यात आली आहे. नावात सुधारणा करण्‍यासाठी शेतकऱ्यांनी आधार कार्डाची प्रत सेतु सुविधा किंवा सीएससी केंद्रावर उपलब्‍ध करुन दयावी.  
शेतकरी स्‍वतः देखील आधारप्रमाणे नावात सुधारणा करू शकतील. यासाठी त्‍यांनी www.pmkisan.gov.in या वेबसाईटवरील उजव्‍या बाजूला Farmers Corner येथे क्लिक केल्‍यावर येणाऱ्या विविध पर्यायापैकी Edit Adhar Failure Record यावर क्लिक करावे. आलेल्‍या स्क्रिनवर Aadhaar नंबर टाकावा ज्‍यानुसार  शेतकऱ्यांचे यापुर्वीचे नोंदविलेले नाव व इतर माहिती दिसेल. या नावापुढे असलेल्‍या रिकाम्‍या जागी शेतकऱ्यांनी आपल्‍या आधार कार्डवर असल्‍यानुसार तंतोतंत नाव टाईप करुन अपडेट बटनवर क्लिक करावे.  याप्रमाणे वैयक्तिक स्‍तरावर दुरुस्‍तीचा पर्यायही उपलब्‍ध करुन दिला आहे.
००००

No comments:

Post a Comment

वृत्त क्र.   93 दहावी परीक्षेच्या ऑनलाईन प्रवेशपत्राबाबत सूचना   नांदेड दि. 23 जानेवारी :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्ष...