Thursday, January 2, 2020


जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष
पदाची निवडणूक 21 जानेवारीला
नांदेड, दि. 2 : नांदेड जिल्‍हा परिषद अध्‍यक्ष व उपाध्‍यक्ष पदाची निवडणुक-2019 ही मंगळवार 21 जानेवारी 2020  रोजी दुपारी 2 वा. नांदेड जिल्हा परिषदेतील कै. यशवंतराव चव्‍हाण सभागृह येथे घेण्यात येणार आहे. या निवडणुकीसाठी पिठासीन अधिकारी म्‍हणून नांदेडचे अपर जिल्‍हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
ग्रामविकास विभाग मुंबई यांचेकडील पत्र क्र.जि.पंनि-2019/प्र.क्र.45अ/पंरा-2 दि.10 डिसेंबर, 2019 अन्‍वये कळविले आहे की सन 2019 चा महाराष्‍ट्र अध्‍यादेश क्र. 22 दि. 23 ऑगस्‍ट 2019 अन्‍वये जिल्‍हा परिषद नांदेडच्‍या अध्‍यक्ष व उपाध्‍यक्ष पदाची मुदत 20 डिसेंबर 2019 रोजी संपत असल्‍यामुळे महाराष्‍ट्र जिल्‍हा परिषद पंचायत समिती अधिनियम 1961 चे कलम 42 व 45 खाली जिल्‍हा परिषद नांदेडच्‍या अध्‍यक्ष व उपाध्‍यक्ष पदाची निवडणुक 21 डिसेंबर 2019 रोजी पासुन उर्वरित पुढील कालावधीसाठी घेण्यात येणार होती.  
नांदेडचे जिल्‍हाधिकारी यांनी नांदेड जिल्‍हा परिषदेच्‍या अध्‍यक्ष व उपाध्‍यक्ष पदाच्‍या निवडणुकीसाठी सर्व सदस्‍य यांना बैठकीची नोटीस विहीत मुदतीत बजावणे मंगळवार 21 जानेवारी 2020  रोजी कै. यशवंतराव चव्‍हाण सभागृह जिल्‍हा परिषद नांदेड येथे सकाळी 10 ते दुपारी 12 या कालावधीत नामांकन स्विकारणे तसेच दुपारी 2 वाजता बैठक बोलावून नामांकन छाननी, नामनिर्देशन मागे घेण्‍याची प्रक्रिया त्‍या दिनांकास अधिसूचनेप्रमाणे अनुक्रमे अध्‍यक्ष पदाच्‍या आरक्षणाप्रमाणे जिल्‍हा परिषद नांदेडच्‍या अध्‍यक्ष व उपाध्‍यक्ष पदाची निवडणुक पुढील उर्वरित कालावधीसाठी घेण्‍यासाठी नांदेडचे अपर जिल्‍हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांची पिठासीन अधिकारी म्‍हणून नियुक्‍ती केली आहे.      
००००

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र. 1129 लोकसभेसाठी 67.81 तर विधानसभेसाठी 69.45 टक्के मतदान  विधानसभेसाठी भोकर येथे सर्वाधिक 76.33 तर नांदेड उत्तरमध्ये 60.6 सर्वात...