Thursday, January 2, 2020

सुधारीत वृत्त


सायबर सेफ वुमन
कार्यक्रमाचे आज आयोजन
नांदेड, दि. 2 : समाजामध्ये वावरत असतांना महिला व बालकांवर अत्याचाराबाबत व सायबर गुन्ह्याबाबत जनसामान्यामध्ये  नांदेड पोलीस दलाच्या वतीने जाणीवजागृती साठी कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.सायबर गुन्ह्यांना आळा घालण्या बरोबरच  महिला वरील अत्याचारास वेळीच प्रतिबंध करण्यासाठी त्यांना प्रचलीत कायदाच्या संरक्षणाची जाणीव करुन देणे हा  या उपक्रमाचा मूळ हेतू आहे, नांदेड जिल्हा पोलीस दलातर्फे सायबर सेफ वुमन या शिर्षकाखाली जागरुकता मोहिम राबविण्यात येत आहे. त्यासाठी शुक्रवार  दि. 3 जानेवारी 2020 रोजी कुसुमताई हायस्कुल, सिडको, नवीन नांदेड येथे सकाळी 10.30 वा. आणि श्रीनिकेतन प्राथमिक व माध्यमिक शाळा दिपनगर नांदेड येथे 11 वा. कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमास जास्तीत जास्त नागरिक, महिला, सामाजिक कार्यकर्ते, पालक,पत्रकार, यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन नांदेड जिल्हा पोलीस दलातर्फे करण्यात आले आहे.
00000

No comments:

Post a Comment

वृत्त क्र.   93 दहावी परीक्षेच्या ऑनलाईन प्रवेशपत्राबाबत सूचना   नांदेड दि. 23 जानेवारी :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्ष...