Thursday, January 2, 2020


जनसंपर्क कक्ष (मुख्यमंत्री सचिवालय)
महिला व बालकांनी सायबर सुरक्षेबाबत जागरुक रहावे
सेफ वूमन मोहिमेसाठीमुख्यमंत्र्यांचा जनतेला संदेश
मुंबईदि.2:महिला व बालकांबाबतचे गुन्हे, लैंगिक अत्याचार आणि फसवणूक यासाठी अनेक समाजकंटकइंटरनेटचा वापर करत आहेत. राज्यात अशा गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी शासन प्रयत्नशील असून महिला व बालकांनीही सायबर सुरक्षेबाबत जागरुक रहावे, असे आवाहन मुख्यमंत्रीउद्धवठाकरे यांनी केले आहे.
महाराष्ट्र सायबर, माहिती व जनसंपर्क व स्थानिक पोलीस यांच्या मदतीने सायबर गुन्हे तसेच इंटरनेटच्या माध्यमातून महिलांवरील गुन्हे रोखण्यासाठी सायबर सेफ वुमनमोहीम सुरू करण्यात आली आहे. याअंतर्गतराज्यातील प्रत्येक जिल्ह्यात जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेला हा संदेश दिला आहे.
सायबर सेफ वुमनमोहिमेतसर्वांनी सहभागी व्हावे आणि महिलांसंदर्भातील गुन्हे रोखण्यासाठी पोलिसांना मदत करावी असे आवाहन करून मुख्यमंत्री आपल्या संदेशात म्हणतात, आजच्या डिजिटल युगात इंटरनेटचे जसे अनेक फायदे आहेत, त्याचबरोबर काही वाईट गोष्टीही त्या माध्यमातून समाजात पसरत आहेत.सायबर गुन्ह्यांचे वाढणारे प्रमाण चिंताजनक असून त्याहीपेक्षा या गुन्ह्यांचे वारंवार बदलणारे स्वरूप जास्त गंभीर आहे.गेल्या काही काळात यामध्ये वाढ झाल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे शासनाने अशा गुन्ह्यांना आळा घालण्याबरोबरच महिला व बालकांच्या सायबर सुरक्षेसाठी विशेष उपाययोजना केल्या आहेत. त्याचाच एक भाग सायबर सेफ वुमनमोहीम असून यासंदर्भातील जनजागृती कार्यक्रमात सर्वांनी सहभागी व्हावे.
-----000-----

No comments:

Post a Comment

वृत्त क्र.   93 दहावी परीक्षेच्या ऑनलाईन प्रवेशपत्राबाबत सूचना   नांदेड दि. 23 जानेवारी :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्ष...