सशस्त्र सेना ध्वजदिन
निधी संकलनास प्रारंभ
गतवर्षीचा निधी संकलनात नांदेडचा गौरव
नांदेड दि. 14 :- सशस्त्र सेना ध्वजदिन निधी 2017-18 च्या संकलनाचा प्रारंभ बुधवार 13 डिसेंबर
जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणातील बचत भवन येथे करण्यात आला. नांदेड जिल्ह्याचे गतवर्षीचे निधी
संकलनाचे उद्दीष्ट 125
टक्क्यांनी पुर्ण करण्यात आले. त्यासाठी राज्य
शासनाने जिल्हाधिकारी व जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांना विशेष सन्मानचिन्ह देवून गौरव करण्यात आला. त्यासाठी निधी
संकलनात योगदान देणाऱ्या विविध कार्यालय प्रमुखांनाही यावेळी प्रशस्तीपत्र
व
बक्षीस देवून गौरवण्यात
आले.
यावेळी निवासी
उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर सुभाष सासने,
प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय तिराणकर, सह. जिल्हा निबंधक सहकारी संस्था प्रविण
फडणीस, लोहा तहसिलदार डॉ. आशिषकुमार बिरादार, मुखेडचे गटविकास अधिकारी व्ही. एन.
घोडके, मेजर
बी.जे. थापा, प्रा. देवदत्त तुंगार यांच्यासह जिल्ह्यातील वीरपत्नी, वीरमाता, वीरपिता, माजी सैनिक,
सैनिकांचे नातेवाईक, नागरीक आदींची मोठ्या संख्येने उपस्थिती
होती.
यावेळी माजी सैनिकांच्या मेळाव्याचेही आयोजन करण्यात आले.
श्री. पाटील
यांनी यावर्षी जिल्ह्याला 35 कोटी 30 लाख 512 रुपयाचे लक्ष दिले असून ते आपण 200 टक्के पुर्ण करु असे सांगितले. वीरनारी, विधवा व माजी सैनिकांची आस्थेवाईक चौकशी केली त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. प्रास्ताविकात सैनिक कल्याण अधिकारी मेजर सुभाष सासने यांनी ध्वजदिन निधीचे महत्व सांगितले. संकलीत झालेल्या निधीचा विनियोग व माजी सैनिकांसाठी विविध कल्याणकारी योजनांची माहिती दिली.
शहीद जवान
संभाजी कदम या जवानाचे बलिदान बघुन चि. राघवेंद्र पाटोदेकर या विद्यार्थ्याने
खाऊसाठी जमा केलेले पैसे सशस्त्र सेनादल निधीस दिले. जिल्ह्यातील माजी सैनिकांनी चि.
राघवेंद्र यांना सायकल दिली. वीरपत्नी श्रीमती कलावतीबाई बोडखे यांना घरकुलासाठी 1 लाख 50 हजार रुपये तर श्रीमती कमलाबाई केरबा
गवले यांचा मुलगा दिवंगत झाल्याने त्यांना 75 हजार रुपये व चि. मिराज, विधवा पत्नी श्रीमती अनिता राठोड
यांना सिंगापुर येथे पॉवर लिफटींग स्पर्धेत तृतीय स्थान प्राप्त केल्याबद्दल 10 हजार
रुपयाची आर्थिक मदत सैनिक कल्याण विभागाकडून प्र. जिल्हाधिकारी श्री. पाटील यांच्या
हस्ते देण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात शहिदांना श्रद्वांजली वाहून करण्यात आली. सुत्रसंचलन माजी
सैनिक श्री. झगडे यांनी केले तर आभार कमलाकर शेटे यांनी मानले. कार्यक्रमाचे
संयोजन सतेंद्र चवरे, संजय देशपांडे, तुकाराम
मसीदवार यांनी केले.
000000
No comments:
Post a Comment