भरडधान्य खरेदी केंद्र खुपसरवाडीला
सुरु ;
शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी
करावी
नांदेड दि.
14 :- खरीप
हंगाम 2017-18 मधील भरडधान्य खरेदीसाठी किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत
शासकीय हमी भावाने भरडधान्य (ज्वारी, बाजरी, मका) खरेदी करण्यासाठी खरेदी केंद्र नांदेड
तालुक्यातील खुपसरवाडी येथील तहसील गोदाम येथे सुरु करण्यात आले आहे. यासाठी
शेतकऱ्यांनी ऑनलाईन पद्धतीने कृषि उत्पन्न बाजार समिती नांदेड येथे नोंदणी करावी,
असे आवाहन शेतकरी बांधवांनी जिल्हा मार्केटींग अधिकारी नांदेड यांनी केले आहे.
भरडधान्याचे आधारभूत दर पुढील प्रमाणे आहेत. मालाचा
प्रकार - ज्वारी ( एफएक्यु) मालदांडी प्रति क्विंटल आधारभूत किंमत 1 हजार 725
रुपये. ज्वारी (एफएक्यु) संकरीत 1 हजार 700 रुपये. बाजरी (एफएक्यु) 1 हजार 425
रुपये. मका (एफएक्यु) 1 हजार 425 रुपये आहे.
भरडधान्य खरेदी केंद्रावर एफएक्यु दर्जाचे
भरडधान्य खरेदी करण्यात येणार आहे. ऑनलाइन नोंदणीसाठी सातबाराचा उतारा पीक
पेऱ्याची नोंद असलेला, आधार कार्डची झेरॉक्स प्रत व बँक पासबुकच्या पहिल्या पानाची
झेरॉक्स प्रत सोबत आणावी. नोंदणी झाल्यानंतर शेतकऱ्यांना खरेदी केंद्रावर भरडधान्य
विक्रीसाठी आणण्यासाठी भ्रमणध्वनीवरुन संदेश देण्यात येणार आहे, असे आवाहन जिल्हा
मार्केटींग अधिकारी नांदेड यांनी केले आहे.
000000
No comments:
Post a Comment