आता कर्जमुक्तीकडे वाटचाल
शेतकरी सुखी तर संपूर्ण राज्य सुखी
ही अत्यंत चांगली भावना लक्षात घेऊन फडणवीस सरकारने केलेल्या कर्जमाफीमुळे आता
राज्याने शंभर टक्के कर्ज मुक्तीकडे वाटचाल सुरू केली आहे. दिनांक 24
जुन 2017 ला राज्य सरकारच्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी
सन्मान योजनेचा निर्णय देशातील अन्य राज्याच्या तुलनेत सर्वात मोठा आणि ऐतिहासीक
आहे. सन 2013 ते 2015 पर्यत राज्याला
नैसर्गिक संकटाना सहन करावे लागले. आवकाळी पाऊस आणि गारपिटीने शेतकरी बेजार
असतांनाच फडणवीस सरकारने जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातुन राज्यातील 44 हजार तलावातुन गाळ काढला त्यामुळे त्यात मुबलक जलसाठा तयार होऊ शकला. जलयुक्त
शिवार योजनेपासुन अनेक लोकोपयोगी निर्णय घेतांना फडणवीस सरकारने सामान्य माणसाचे
हित डोळ्यासमोर ठेवुन नियोजनबद्ध उत्कृष्ट अमलबजावणी सुरू केली. छत्रपती शिवाजी
महाराज शेतकरी सन्मान योजना ही तर राज्यातील संपुर्ण शेतकऱ्यांना दिवाळीचा आनंद
देणारी ठरली देशातील सर्वात मोठा 34 हजार कोटी रुपयाच्या
कर्जमाफीचा निर्णय ही साधी गोष्ट नव्हती, ती मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आणि राज्याचे नेतृत्व किती धाडशी आणि लोकाच्या
कल्याणाचे आहे. हे देशाला दाखवुन दिले या कर्जमाफीमुळे राज्यातील 34 लाख शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होण्यास मदत मिळणार आहे.
शेतकरी कर्जमाफी हा
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने निर्मित कार्यक्रमात मी मुख्यमंत्री बोलतोयमध्ये
राज्यातील विविध भागातील शेतकऱ्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरे देऊन
मुख्यमंत्र्यांनी स्वतःची अभ्यासुवृत्ती जनतेला दाखवुन दिली. कर्जमाफी हे अंतिम
उद्दिष्ट नसुन शंभर टक्के कर्जमुक्त महाराष्ट्र हे आहे. त्यामुळेच पुढील पाच
वर्षात खऱ्या अर्थाने महाराष्ट्र सुजलाम सुफलाम झाल्या शिवाय राहणार नाही.
छत्रपती शिवाजी
महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत नांदेड जिल्ह्यातील 83
हजार 950 शेतकऱ्यांना 396 कोटी,
42 लाख एवढ्या मोठ्या रक्कमेची कर्जमाफी झाली आहे. त्यामुळे विविध
कारणाने बेजार असलेल्या शेतकऱ्याला जगण्याचे बळ मिळाले आहे. कोणत्याही परिस्थितीत
शेतकरी सुखी झाला पाहिजे ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तळमळ आता फळाला आली
आहे. कर्जमुक्ती योजनेतील पात्र शेतकऱ्यांना एक लाख 50 हजार
पर्यत तर नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर रक्कम देण्यास शासन
प्रयत्नशील आहे. नांदेड जिल्ह्यात एकुण 83 हजार 950 शेतकऱ्यांच्या खात्यात 396 कोटी, 42 लाख, 16 हजार, 887 रूपये जमा
करण्यात आले आहेत. जिल्ह्यातील व्यापारी, राष्ट्रीयकृत आणि
ग्रामीण बँकाकडून 11 डिसेंबर 2017
पर्यंत 57 हजार, 239 शेतकऱ्यांच्या
खात्यात 359 कोटी, 21 लाख रुपये जमा
करण्यात आले आहेत. अशा प्रकारे नांदेड जिल्हयात एकुण 83 हजार,
950 शेतकऱ्यांच्या खात्यात 396 कोटी 42 लाख, 16 हजार 887 रुपये जमा
केले आहेत.
छत्रपती शिवाजी महाराज
शेतकरी सन्मान योजनेंतर्गत शेतकऱ्यांनी कर्जमाफीचे ऑनलाईन अर्ज केल्यानंतर प्रशासन
व बॅक स्तरावरून कर्जाची माहिती लेखा परिक्षण करून माहिती तंत्रज्ञान विभागामार्फत
पात्र लाभार्थी शेतकऱ्यांची लिस्ट बँकाना देण्यात आली त्या यादीनुसार बॅंकेमार्फत
संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर कर्जमाफी व प्रोत्साहनपर लाभाची रक्कम हस्तांतरीत
करणे सुरू झाले आहे. याची इंतभुत माहिती एसएमएस द्वारे शेतकऱ्यांना दिली जात आहे.
अशा प्रकारे शेतकऱ्यांना विविधागाने मदत करण्याचा उपक्रम खरोखर
ऐतिहासीक ठरणारा आहे.
शेतकऱ्यांना केवळ
कर्जमाफी देऊन सरकार मोकळे झालेले नाही तर शेतीला मुबलक विजपुरवठा व्हावा यासाठी
सोलर फिडर योजना कार्यान्वित केली आहे. त्यामुळे 12
तास विजपुरवठा होईल आणि शेती सिंचन ही होईल. हे राज्य छत्रपती शिवरायाच्या
विचारावर चालणारे आहे. शिवरायाचा आदर्श शेतकऱ्यांपुढे सतत असल्यामुळे त्यांच्या
नावे सुरू केलेली योजना राज्याला बळ देणारी ठरली आहे. कर्जमाफी अंतिम नसुन शेती
उद्योगात गुंतवणुक वाढली पाहिजे, शेतीला पुरक असणारे जोडधंदे,
कृषी मालाला योग्य बाजारपेठ, हमी भाव आणि दळण
वळणाच्या सोयी आदीसाठी नियोजनबद्ध काम सुरू आहे.
बळीराजा चेतना
अभियानांतर्गत विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्येचे प्रमाण 30
टक्के कमी झाले आहे. सन 2015 च्या तुलनेत सन 2016 चे आत्महत्येचे आकडे 30 टक्केने कमी आहेत हे या
योजनेचे फलित म्हणावे लागेल, संकटात असलेल्या शेतकऱ्यांना
मुख्यमंत्री सहाय्यता निधी योजनेमार्फत आर्थिक सहाय्य करून त्याच्या जगण्याला बळ
दिले जात आहे. कर्जमाफीच्या निर्णयाचे मराठवाड्यातील नव्हे तर राज्यातील शेतकऱ्यांनी
स्वागत करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मनापासुन अभिनंदन केले आहे. हे
सरकार आता सदैव शेतकऱ्यांच्या पाठीशी राहणार असा आत्मविश्वास व्यक्त केला आहे.
कर्जमाफीमुळे राज्यातील 8 लाख 40 हजार
शेतकऱ्यांच्या आयुष्यात यंदाची दिवाळी वेगळाच आंनद देऊन गेली. मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेला कर्ज माफीचा निर्णय न भुतोन भविष्यती ठरणारा आहे.
म्हणुनच राज्यातील 20 हजार शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री देवेद्र
फडणवीस यांचेशी एसएमएसद्वारे संवाद साधुन निर्णयाचे स्वागत केले आहे. कारण
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या योजनेची संपुर्ण माहिती सामान्य माणसापर्यंत
पोहचावी याची दक्षता घेतली आहे. कर्जमाफी करतांना शेतकऱ्यांची पात्रता ठरविताना
थकबाकीदार शेतकऱ्यांचे अल्प/अत्यल्प भुधारक याप्रमाणे जमीन धरणेचे क्षेत्र विचारात
न घेता 1 एप्रिल 2009 रोजी व त्यानंतर
पिककर्ज घेतलेल्या कर्जापैकी 30 जुन 2016
रोजी थकबाकीदार असलेल्या शेतकऱ्यांना काही निकषाच्या आधीन राहुन सरसकट कर्जमाफी
देण्यात यावेत कर्ज माफीच्या संदर्भात काढण्यात आलेल्या पत्रकात सविस्तर माहिती
देण्यात आलेली आहे. नऊ हजार कोटी मंजुर करण्यात आले होते. आता या योजनेअंतर्गत
मात्र 34 हजार कोटी कामी येणार आहेत. महत्वाचे म्हणजे
बळीराजाच्या विद्यमान सरकारवरील विश्वास वाढला आहे. संकटकाळी सरकार आपला पाठीराखा
आहे, ही समज आता 100 टक्के कर्जमुक्तीकडे वाटचाल करणारी
ठरणार आहे.
ज्येष्ठ पत्रकार माधव अटकोरे
मो. 8087565172
*******
No comments:
Post a Comment