स्वातंत्र्य सैनिक निवृत्तीवेतन योजनेचे
अर्ज 7 जानेवारी पर्यंत स्विकारले जाणार
नांदेड दि.
14 :- राज्य
शासन स्वातंत्र्यसैनिक निवृत्तीवेतन योजना-पुनर्विलोकन अंतर्गत शासन निर्णयातील
विहित निकषानुसार मुळ प्रतीत आवश्यक पुरावे असतील त्या अर्जदारांचे अर्ज
जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे 7 जानेवारी 2018 पर्यंत स्विकारण्यात येणार
आहेत. शासन निर्देशानुसार त्यानंतर येणार अर्ज स्विकारण्यात येणार नाहीत, असे
जिल्हाधिकारी नांदेड यांनी कळविले आहे.
मागील 10 वर्षाचे कालावधीत स्वातंत्र्य सैनिक निवृत्तीवेतन
मंजुरीसाठी नव्याने अर्ज सादर करणाऱ्या अर्जदारांची संख्या नगण्य असून बहुतांश
जिल्ह्याची यासंदर्भात संख्या निरंक आहे. तसेच ज्यांनी यापुर्वी अर्ज केले होते व
ज्यांच्याकडे परिपूर्ण कागदपत्र, पुरावे नसल्याने ज्यांचे नामंजूर करण्यात आले
आहेत त्याच व्यक्ती पुन्हा-पुन्हा शासनास अर्ज करीत असून अशा अर्जदारांचा कल बोगस
कागदपत्र तयार करण्याकडे होत असल्याचे शासनाच्या निदर्शनास आले आहे. राज्य शासन
स्वातंत्र्य सैनिक निवृत्तीवेतन योजनेचे शासनस्तरावर पुनर्विलोकन करुन शासनाने या
योजनेखाली अर्ज करण्याची एक अखेरची संधी उपलब्ध करुन दिली आहे. ज्या अर्जदारांकडे
शासन निर्णय 4 जुलै 1995 अन्वये व 18 एप्रिल 2015 अन्वये विहित निकषांनुसार मुळ
प्रतीत आवश्यक पुरावे असतील त्यांनी 7 जानेवारी पर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयात
अर्ज सादर करावीत, असे आवाहन जिल्हाधिकारी नांदेड यांनी केले आहे.
000000
No comments:
Post a Comment