Friday, November 15, 2024

वृत्त क्र. 1094

मोठ्या प्रमाणात निवडणूक साहित्याचे वितरण

साहित्य वितरण कक्षाची अविरत सेवा

नांदेड दि. 15 नोव्हेंबर : मुंबई, पुणे, संभाजीनगर आदी ठिकाणावरून शासकीय मुद्रणालय व पुरवठादार यांच्याकडून प्राप्त होणारे विविध प्रकारचे साहित्य वितरणाचे महत्त्वपूर्ण काम साहित्य वितरण कक्षातून सुरू आहे. नांदेड लोकसभा पोटनिवडणूक व विधानसभा सार्वत्रिक निवडणूक मतदारसंघासाठी जवळपास हे वितरण सुरु आहे.

लोकसभा पोटनिवडणूक व विधानसभा निवडणुकीमध्ये आवश्यक साहित्य वितरण वेळेत व्हावे, याला अधिक महत्त्व दिले जाते. यासाठी आचारसंहिता लागल्यापासून साहित्य वितरण कक्ष स्थापन केला जातो. जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीमती रूपाली चौगुले यांच्या मार्गदर्शनात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरातील नियोजन भवनांमध्ये या साहित्य कक्षाची उभारणी करण्यात आली आहे.

निवडणुकांमध्ये मतदान केंद्रावर आवश्यक ते सर्व साहित्य पुरविणे व त्याची नोंद या कक्षामार्फत करण्यात येते. अधिक सुबक, प्रगत असे साहित्य सध्या वापरण्यात येत आहे. ईव्हीएमचे बॅलेट युनिट कव्हर करणारे कंपार्टमेंट, पोस्टर, सूचना पत्र,ओळखपत्रे, लेखन सामग्री, स्टेशनरी, विविध नमुने, लिफाफे, कागदी सील, वोटर स्लिप, बॅलेट पेपर, शिक्के, माहितीपुस्तिीका, हस्तपुस्तिका, मतदान अधिकाऱ्याना वापरण्यात येणारे विविध प्रकारचे  आवश्यक साहित्य या कक्षामार्फत दिले जाते. जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्यासह त्यांची मोठी टीम या कार्यामध्ये सहभागी झाली आहे.

00000














No comments:

Post a Comment

    वृत्त क्र. 68 नांदेड जिल्ह्यातील 67 रेती घाटांची जिल्हाधिकाऱ्यांच्या समक्ष पर्यावरणीय जन सुनावणी  स्थानिक रोजगाराला प्राधान्य देण्याचा स...