वृत्त क्र. 1095
मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी
पाचशे कामगारांना मतदानासाठी मिळाली अर्धी सुट्टी
कामगाराना दिली मतदान करण्याची शपथ
नांदेड दि. 15 नोव्हेंबर : माझ्या एका मताने फरक पडतो म्हणून प्रत्येकांनी मतदान केलेच पाहिजे. जिल्हा निवडणूक अधिकारी अभिजीत राऊत व 087 विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी डॉ सचिन खल्लाळ यांच्या आवाहनास प्रतिसाद देत , गुंडेगाव परिसरातील सुप्रीम गोल्ड लिमिटेड , सुरज रूफिंग व सुरज मेटल्स अशा विविध कंपनीतील जवळपास पाचशे कामगारांना येत्या 20 नोव्हेंबर रोजी मतदानासाठी पगारी अर्धी सुट्टी आज घोषित केली आहे. अशी घोषणा सुरज ग्रुप इंडस्ट्रीजचे चेअरमन रमेशसेठ पारसेवार,संचालक रामसेठ तुप्तेवार,राहूल पारसेवार व गजानन येरावार यांनी केली.
मतदान टक्केवारी वाढवण्यासाठी व मतदान जनजागृतीच्या कार्यासाठी सुट्टी जाहीर केली. गुंडेगाव परिसरातील सुप्रीम गोल्ड लिमिटेड , सुरज रूफिंग व सुरज मेटल्स अशा विविध कंपनीतील जवळपास पाचशे कामगारांसाठी 087 नांदेड दक्षिण स्वीप कक्षाच्यावतीने मतदान जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी रामसेठ तुप्तेवार यांनी कामगारांना मतदानाचे महत्त्व पटवून देवून ‘मी मतदान करणारच’ अशी शपथ दिली. या कार्यक्रमास रुस्तुम आडे, डॉ घनश्याम येळणे, प्रा.राजेश कुलकर्णी, संजय भालके, बंडू आमदूरकर व बालासाहेब कच्छवे यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर.जी.कुलकर्णी यांनी केले तर आभार एस.व्ही. भालके यांनी मानले.
0000
No comments:
Post a Comment