Tuesday, October 8, 2024

वृत्त क्र. 913

एनसीसीएफमार्फत आधारभूत दरानुसार मुग, उडिद व सोयाबिन खरेदी

प्रत्यक्षात मुग, उडिद खरेदी 10 ऑक्टोबर व सोयाबिन खरेदी 15 ऑक्टोबरपासून 

नांदेड दि. ८ ऑक्टोबर : महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ, मुंबई व नाफेड व एनसीसीएफ कार्यालय, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमानाने हंगाम 2024-25 मध्ये राज्यात केंद्र शासनाने निश्चित केलेल्या आधारभुत दरानुसार नाफेड व एनसीसीएफ मार्फत मुग, उडिद व सोयाबीन खरेदीसाठी शेतकरी नोंदणी 1 ऑक्टोबरपासुन सुरु झाली आहे. प्रत्यक्षात मुग, उडिद खरेदी 10 ऑक्टोबरपासून आणि सोयाबीन खरेदी 15 ऑक्टोबर 2024 पासुन सुरु करण्यात येणार आहे.

एनसीसीएफद्वारे नांदेड जिल्ह्यासाठी एकूण 14 खरेदी केंद्र मंजूर आहेत. त्याच्यामार्फत शासनाने निश्चित केलेल्या कालावधीत मुग, उडिद व सोयाबीन खरेदी करण्यात येणार आहे. तरी शेतकऱ्यांनी केंद्र शासनाने निश्चित केलेल्या आधारभूत दरानुसार मुग, उडिद व सोयाबीन खरेदी योजनेचा लाभ घ्यावा. सदर योजना ही शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळावा यासाठी राबविण्यात येत आहे. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी मुग, उडिद व सोयाबीन विक्रीसाठी आपल्या गावाजवळील एनसीसीएफच्या नजीकच्या खरेदी केंद्रावर सातबारा उतारा, आधारकार्ड व बँकेचे पासबुक खरेदी केंद्रावर घेवून जावे व जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन पणन महासंघाचे अध्यक्ष दत्तात्रय भाऊसाहेब पानसरे, उपाध्यक्ष रोहीत दिलीप निकम, सर्व संचालक मंडळ, व्यवस्थापकीय संचालक श्रीघर बी. डुबे-पाटील  व सरव्यवस्थापक देविदास भोकरे यांनी केले आहे.

00000

No comments:

Post a Comment

विकसित महाराष्ट्र २०४७ Vision Document तयार करण्याच्या अनुषंगाने केल्या जाणाऱ्या सर्वेक्षणात सर्वसामान्य जनतेचा सहभाग महत्वाचा असून शासनाकडू...