Tuesday, October 8, 2024

 वृत्त क्र. 1887

 

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ

स्पर्धा 2024 चा निकाल घोषित

सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते 9 ऑक्टोबर रोजी पारितोषिक वितरण.

मुंबईदि. 08 राज्य शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग आणि पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या वतीने घेण्यात आलेल्या उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा 2024 चा निकाल घोषित करण्यात आला आहे. राज्यस्तरीय प्रथम पुरस्कार भारत माता गणेश मंडळदेवनांदरा, जि. परभणीद्वितीय पुरस्कार जय भवानी मित्र मंडळठाणे व तृतीय पुरस्कार वसुंधरा वृक्षरुपी गणेशोत्सवलातूर यांना जाहीर झाला आहे.

राज्यातील पहिला क्रमांकाच्या उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळास पाच लाखद्वितीय क्रमांकास दोन लाख 50 हजार आणि तृतीय क्रमांकास रुपये एक लाख इतक्या रकमेचे पारितोषिकसन्मानाचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. याशिवाय उर्वरित 36 जिल्ह्यांसाठीही जिल्हानिहाय पारितोषिक विजेते जाहीर करण्यात आले आहेत. जिल्हास्तरीय पारितोषिकाचे स्वरूप रुपये 25000 प्रत्येकीसन्मान चिन्ह व प्रमाणपत्र असे आहे. सर्व राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय विजेत्यांचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अभिनंदन केले आहे.

स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षीय उपस्थितीत बुधवारता. 9 ऑक्टोबर 2024 रोजी होणार आहे. यशवंत नाट्यमंदिरमाहीममुंबई -16 येथे दुपारी बारा वाजता हा पारितोषिक वितरण समारंभ असून शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकरखासदार अनिल देसाई आणि आमदार सदा सरवणकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. यावेळी साईलीला कला मंच व विनायक पुरुषोत्तम लिखित व दिग्दर्शितमहाराष्ट्राची हास्यजत्रा फेम कलाकार निखिल बने व निमिष कुलकर्णी यांचे सादरीकरण असलेला नमन गणेशा हा सांस्कृतिक कार्यक्रमही होणार आहे. या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव तथा सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे यांनी केले आहे.

राज्यस्तरीय निकाल 2024

क्र.

मंडळाचे नाव

जिल्हा

राज्यस्तरीय क्रमांक

1

भारतमाता गणेश मंडळ

परभणी

प्रथम

2

जय भवानी मित्र मंडळ

ठाणे

द्वितीय

3

वसुंधरा वृक्षरुपी गणेशोत्सव

लातूर

तृतीय

 

जिल्हास्तरीय निकाल 2024

.क्र.

जिल्हा

विजेते मंडळ

1

मुंबई

रंगारी बदक चाळ रहिवाशी संघ

श्रीहनुमान सेवा मंडळ

शिवाजी पार्क (हाऊससार्वजनिक गणेशोत्सव मंडळ

2

मुंबई उपनगर

श्री गणेश क्रिडा मंडळ

बर्वेनगर  भटवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ

शिवगर्जना तरुण मित्र मंडळ

3

ठाणे

जय भवानी मित्र मंडळ

न्यू ग्रीनवूड सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ

शिवसम्राट मित्र मंडळ

4

पालघर

साईनगर विकास मंडळ

5

रायगड

सार्वजनिक गणेशोत्सव ट्रस्टरोहा

6

रत्नागिरी

पालघरवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ

7

सिंधुदुर्ग

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ

8

पुणे

एकता मित्र मंडळ

सम्राट मित्र मंडळ

मार्केटयार्ड मित्र मंडळ

9

सातारा

अभय कला  क्रीडा गणेशोत्सव मंडळ

10

सांगली

मोरया प्रतिष्ठान

11

कोल्हापूर

छत्रपती श्रीशाहू तालीम मंडळ

12

सोलापूर

यशोदिप युवा सांस्कृतिक  बहुद्देशीय संस्था

13

नाशिक

शिव युवा प्रतिष्ठान सार्वजनिक गणेश उत्सव

14

धुळे

वंदे मातरम प्रतिष्ठान

15

जळगाव

जळगाव जनता  बँक कर्मचारी गणेश मंडळ

16

.नगर

ज्ञानविद्या बहुद्देशीय संस्था

17

नंदुरबार

श्रीअण्णा गणेश मंडळ

18

.संभाजी नगर

कुलस्वामिनी प्रतिष्ठान गणेश मंडळ

19

बीड

सरस्वती गणेश मंडळ

20

जालना

श्रीसंत सावता गणेश मंडळ

21

धाराशिव

तुळजाई सांस्कृतिक  क्रिडा गणे मंडळ

22

नांदेड

श्रीछत्रपती शिवाजी महाराज गणे मंडळ

23

लातूर

वसुंधरा वृक्षरुपी गणेशोत्सव

24

परभणी

भारतमाता गणेश मंडळ

25

हिंगोली

श्रीओमसाई गणेश मंडळ

26

अमरावती

श्रीबजरंग गणेशोत्सव मंडळ

27

अकोला

स्वविनायक राखोंडे स्मृती गणेशोत्सव मंडळ

28

बुलढाणा

तानाजी व्यायाम शाळा गणेश मंडळ

29

यवतमाळ

जय विजय गणेशोत्सव मंडळ

30

वाशीम

विघ्नहर्ता गणेश मंडळ

31

नागपूर

भारत क्रिडा मंडळ

32

भंडारा

हनुमान व्यायाम शाळा गणेशोत्सव मंडळ

33

चंद्रपूर

श्रीनवयुवक बाल गणेश मंडळ

34

गडचिरोली

टायगर ग्रुप (गडचिरोली जिल्हा हुद्देशीय विकास संस्था)

35

गोंदिया

सार्वजनिक बाल गणेश मंडळ

36

वर्धा

...

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र. 954 राजकीय पक्षानी निवडणूक आयोगाच्या दिशानिर्देशांचे पालन करावे -           जिल्हाधिकारी अभिजीत राऊत • राजकीय पक्षांचे प्...