Wednesday, August 21, 2024

  वृत्त क्र. 751

वेतन देयकासाठी कर्मचाऱ्यांची माहिती  

ऑनलाईन आज्ञावलीत नोंदवावी   

जिल्हा सांख्यिकी कार्यालयाचे आवाहन   

नांदेड दि21 ऑगस्ट :- शासकीय कर्मचाऱ्यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 तयार करण्याचे काम जिल्हा सांख्यिकी कार्यालय नांदेड मार्फत सुरू करण्यात आले आहे.  नियोजन विभागाचे शासन परिपत्रक क्र. असांसं-1324/प्र.क्र.93/का.1417 दि19 ऑगस्ट 2024 नुसार जिल्ह्यातील सर्व राज्य शासकीय कार्यालयातील आहरण व संवितरण अधिकारी यांनी त्यांच्या कार्यालयाती व त्यांच्या आस्थापनेवरील नियमित, नियमितेतर, रोजंदारीवरी, अंशकालीन, मानसेवी व तदर्थ तत्वावर असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांची दिनांक 1 जुलै 2024 या संदर्भ दिनांकाची माहिती ऑनलाईन आज्ञावली मध्ये नोंदविणे आवश्यक आहे.

ही माहिती ऑनलाईन नोंदवून जिल्हा सांख्यिकी कार्यालयाचे प्रमाणपत्र-1 जोडल्याशिवाय वेतन देयके कोषागार कार्यालयाकडून स्विकारण्यात येणार नाहीत. याची सर्व राज्य शासकीय आहरण व संवितरण अधिकारी यांनी नोंद घ्यावी. तसेच ज्या शासकीय कार्यालयांची वेतन देयके कोषागारात सादर होत नाहीत, अशा सर्व कार्यालयांनी सुद्धा त्यांच्या कर्मचाऱ्यांची व रिक्त पदांची माहिती ऑनलाईन आज्ञावलीद्वारे नोंदणी करावी. अधिक माहितीसाठी  उपसंचालक, जिल्हा सांख्यिकी कार्यालय, नांदेड 02462-252775 -मेल dso.nanded88@gmail.com येथे संपर्क साधावा.  कर्मचारी सर्वंकष माहितीकोष 2024 बाबत ऑनलाईन आज्ञावलीमध्ये माहिती नोंदवावी, असे आवाहन जिल्हा सांख्यिकी कार्यालयाच्या उपसंचालक प्रज्ञा प्र. पांढरे यांनी केले आहे.

00000

No comments:

Post a Comment

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...