Wednesday, August 21, 2024

  वृत्त क्र. 750

महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी अनुदान योजनेच्या

लाभासाठी शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण करुन घ्यावे : जिल्हाधिकारी

 

नांदेडदि. 21 ऑगस्ट :- महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी प्रोत्साहनपर अनुदान योजना 2019 योजनेअंतर्गत 33 हजार 602 शेतकऱ्यांची विशिष्ट क्रमांकासह यादी यापुर्वीच प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यापैकी 1 हजार 75 शेतकऱ्यांनी अद्याप आधार प्रमाणीकरण (-केवायसीकेले नाही. त्यामुळे सदर शेतकरी अद्याप शेतकरी प्रोत्साहनपर अनुदान योजनेच्या लाभापासून वंचित आहेतत्यामध्ये प्रामुख्याने नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे 892 तर एचडीएफसी बँकेचे 39 कर्जदार शेतकरी समाविष्ट आहेत.

महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी प्रोत्साहनपर अनुदान योजना 2019 या योजनेचे ऑनलाईन पोर्टल ऑगस्ट अखेरपर्यंत चालु असुन आधार प्रमाणीकरण (-केवायसीकेल्यानंतर शेतकऱ्यांच्या बँक खात्यात प्रोत्साहनपर अनुदानाची रक्कम जमा होणार आहेतरी आधार प्रमाणीकरण (-केवायसी केलेल्या शेतकऱ्यांनी तातडीने आधार प्रमाणीकरण करून घेऊन महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी प्रोत्साहनपर अनुदान योजनेचा लाभ घ्यावाअसे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत व जिल्हा उपनिबंधक विश्वास देशमुख यांनी केले आहे.

00000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.  855   जिल्ह्यात  " हरित ऊर्जा सौर क्रांती "  मो ही म     ·    5 हजार   पेक्षा जास्त लोकसं ख्येचे गाव  मॉडेल सोलर व्ह...