वृत्त क्र. 753
काळेश्वर मंदिराजवळील
नदी पात्र परिसरात प्रतिबंध आदेश
नांदेड दि. 21 ऑगस्ट : नांदेड तालुक्यातील काळेश्वर मंदिराजवळील नदी पात्र परिसरात, जलाशयावर, धरण परिसरात जाऊन गर्दी करणे तसेच अनधिकृत बोटिंग चालविणे, बोटींमधून पर्यटकांना बसवून जलाशयामधून फिरविणे, नदीपात्रात स्नान करणे अथवा पोहण्यासाठी उतरणे, शासनाने ठरवून दिलेल्या मर्यादा रेषा ओलांडून पुढे जाणे, धोकादायक ठिकाणी ग्रुप फोटो, सेल्फी काढणे, इत्यादींना 21 ऑगस्ट रोजी 12 वाजेपासून ते 18 ऑक्टोंबर 2024 रोजीच्या 24 वाजेपर्यंत भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 प्रमाणे जिल्हादंडाधिकारी अभिजीत राऊत यांनी प्रतिबंध केले आहे. (हा आदेश काळेश्वर मंदिरात दर्शनासाठी येणा-या भाविकांसाठी लागू राहणार नाही) आणिबाणीचे प्रसंगी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 (2) अन्वये एकतर्फी आदेश निर्गमीत केले आहेत.
00000
No comments:
Post a Comment