वृत्त क्र. 495
मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजनेअंतर्गत
वैयक्तिक शेततळे योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन
· वैयक्तिक शेततळयासाठी 4 कोटी 18 लाख रुपये मंजूर तरतूद
नांदेड दि. 19 :- नांदेड जिल्ह्यासाठी मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजना-वैयक्तिक शेततळे सन 2024-25 अंतर्गत तालुकानिहाय लक्षांक वाटप करण्यात आले आहे. या लक्षांकासाठी 4 कोटी 18 लक्ष रुपयांची तरतूद मंजूर आहे. त्यानुसार जिल्ह्याची प्रवर्गनिहाय खातेदार संख्या व पेरणी क्षेत्रानुसार तालुकानिहाय लक्षांक निश्चित करण्यात आले आहे. तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजनेअंतर्गत वैयक्तीक शेततळे या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी केले आहे.
मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजनेअंतर्गत वैयक्तीक शेततळे सन 2024-25 अंतर्गत सर्वसाधारण, अनु.जाती, अनु. जमातीसाठी तालुका निहाय लक्षांक पुढीलप्रमाणे आहे. नांदेड -31, अर्धापूर-22, मुदखेड-25, लोहा-56, कंधार-58, देगलूर -48, मुखेड-66, नायगांव-43, बिलोली-41, धर्माबाद-23, किनवट-47, माहूर-21, हदगांव-58, हिमायतनगर-29, भोकर-33, उमरी-27 असे एकूण 628 भौतिक लक्षांक प्राप्त झाले आहे. या भौतिक लक्षांकासाठी जिल्ह्यास एकूण 4 कोटी 18 लक्ष रुपये आर्थिक तरतूद मंजूर आहे.
00000
No comments:
Post a Comment