Wednesday, June 19, 2024

वृत्त क्र. 497

संजय गांधी निराधार व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेच्या

लाभार्थ्यांना डीबीटी पोर्टलद्वारे अर्थसहाय्य वितरित


·   डीबीटी पोर्टलद्वारे अर्थसहाय्य वितरीत करण्यासाठी 25 जूनपर्यत कागदपत्रांची पूर्तता करावी


नांदेड दि. 19 :- जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या सूचनेनुसार नांदेड महानगरपालिका क्षेत्रातील संजय गांधी निराधार व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेच्या लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डीबीटी पोर्टलद्वारे होणार आहे. त्यासाठी प्रत्येक लाभार्थ्यांनी आपल्या बँक खात्याच्या पहिल्या पानाची पासबुकची झेरॉक्स ,आधारकार्डची झेरॉक्सदिव्यांग प्रमाणपत्रदुर्धर आजार असेल तर त्याबाबतचे प्रमाणपत्रमोबाईल नंबर इत्यादी तलाठी शेळके व श्रीमती बोकन संजय गांधी शहर योजना यांच्याकडे अथवा संजय गांधी निराधार योजना कार्यालय, नांदेड शहर जिल्हाधिकारी कार्यालय परिसर येथे 25 जून 2024 पर्यंत जमा करावेत असे आवाहन तहसिलदार संजय गांधी योजना नांदेड शहर यांनी केले आहे.  

 

आजपर्यंत 2 हजार 522 लाभार्थ्यांनी कागदपत्रे कार्यालयात जमा केली आहेत. अजून 4 हजार 117 लाभार्थ्यांचे कागदपत्रे जमा करावयाची शिल्लक आहेत .जे लाभार्थी विहित मुदतीमध्ये आपले कागदपत्रे जमा करणार नाहीत त्यांचा लाभ त्यांच्या खात्यावर जमा होणार नाही. त्यामुळे सर्व संजय गांधी निराधार व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेच्या लाभार्थ्यांना विहित मुदतीत आपले कागदपत्रे सादर करावीत, असे आवाहन तहसीलदार संजय गांधी योजना नांदेड शहर यांनी केले आहे.

००००

No comments:

Post a Comment

वृत्त क्र. 907 प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे नांदेड विमानतळावरून प्रस्थान नांदेड दि. 5 ऑक्टोबर :- बंजारा समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या प...