Wednesday, June 19, 2024

 वृत्त क्र. 501

युवकांनी योग अभ्यास आत्मसात करून योगाचा प्रचार करावा

माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण

नांदेडदिनांक 19:   विविध आजारांवर नियंत्रण मिळण्यासाठी आणि  निरंतर निरोगी तसेच सुदृढ  राहण्यासाठी योग अभ्यास आणि नियमित योगसाधना आवश्यक आहे. तरुणांनी योग अभ्यास आत्मसात करून लोकांमध्ये योगाचा प्रचार करावा असे  आवाहन माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण यांनी केले आहे.

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे केंद्रीय संचार ब्यूरो व श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटी नांदेड यांच्या विद्यमाने व  आर्ट ऑफ लिविंग यांच्या सहकार्याने आज यशवंत महाविद्यालयाच्या परिसरातील बहुउद्देशीय क्रीडा संकुल नांदेड येथे मल्टीमीडिया चित्रपट  प्रदर्शनाचे उदघाटन खासदार अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

यावेळी श्री शारदा भवन एज्यूकेशन सोसायटीचे सचिव  डी. पी. सावंत,  मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडेजिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार ढेमरेनगर रचना विभागाचे सहायक संचालक पी.एल. आलूरकरश्री शारदा भवन एज्यूकेशन सोसायटी रजिष्ट्रार संदीप पाटीलरावसाहेब शेंदारकरनरेंद्र चव्हाण क्षेत्रीय प्रचार अधिकारी माधव जायभाये,    द आर्ट ऑफ लिविंगचे समन्वयक शिवा बीरकलेसहायक क्षेत्रीय प्रचार अधिकारी सुमित दोडल आणि सर्व प्राध्यापक वर्ग तसेच संस्थेचे कर्मचारी-विद्यार्थी  आदी मान्यवर होते.

अलीकडच्या काळात जीवनशैलीमध्ये मोठ्या प्रमाणावर बदल झाला असून लोक वेगवेगळ्या आजारांना बळी पडत आहेतयासाठी नियमित योगाभ्यासासोबत नैसर्गिक जीवनशैली तसेच योग्य आहार घेतला पाहिजे. नांदेड येथील केंद्रीय संचार ब्यूरो द्वारे प्रदर्शित करण्यात आलेल्या प्रदर्शनाचे कौतुक खासदार अशोकराव चव्हाण यांनी केले. तसेच शहरातील सर्व विद्यार्थी व नागरिकांनी या प्रदर्शनाची  पाहणी करून योग अभ्यासाची माहिती घ्यावी असेही  ते म्हणाले.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकारामुळे देश विदेशात मोठ्या प्रमाणावर योगाचा प्रचार आणि प्रसार होत असून जनता योगाभ्याकडे वळत असल्याचे ते म्हणाले.

हे प्रदर्शन दिनांक 19 ते 21 जून 2024 दरम्यान सकाळी 9 ते सायंकाळी 6 पर्यंत सर्वासाठी खुले आहेया प्रदर्शनानिमित्त तीन दिवस योग शिबाराचे आयोजन प्रदर्शनस्थळी करण्यात आले आहे. प्रदर्शानिमित पोष्टर स्पर्धासांस्कृतिक कार्यक्रम आणि जनजागरण रॅलीचेही आयोजन करण्यात आले आहे. नागरिकांनी यांचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

00000








No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...