Wednesday, June 19, 2024

वृत्त क्र. 500

धर्माबाद शहरात 30 तंबाखू विक्रेत्यांवर दंडात्मक कार्यवाही

नांदेड दि. 19 :- धर्माबाद शहरात तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाची मोठ्या प्रमाणात विक्री तसेच कोटपा 2003 कायद्याचे उल्लंघन होत असल्याबाबत मिळालेल्या माहितीनुसार जिल्हास्तरीय तंबाखू नियंत्रण पथकाने 18 जून 2024 रोजी धर्माबाद शहरात अचानक धाडी टाकून एकूण 30 तंबाखू विक्रेत्यांकडून 14 हजार  रुपये दंड आकारण्यात आला.

ही कार्यवाही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय पेरके, नोडल अधिकारी डॉ. हनमंत पाटील व वैद्यकीय अधिक्षक डॉ. वेणुगोपाल पंडीत यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या पथकात नोडल अधिकारी डॉ. हनमंत पाटीलजिल्हा सल्लागार डॉ. उमेश मुंडे, मानसशास्त्रज्ञ प्रकाश आहेरसामाजिक कार्यकर्ता बालाजी गायकवाडसमुपदेशक नितीन आडे व केस रजिस्ट्री सहाय्यक सुनील तोटेवाड तसेच धर्माबाद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अभिषेक शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली  पोलीस हेड कॉन्स्टेबल कुमरे व पोलीस कॉन्स्टेबल सुपारे उपस्थित होते.

सार्वजनिक ठिकाणी तसेच शैक्षणिक अथवा शासकीय, निमशासकीय कार्यालयाच्या परिसरात तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाची विक्री अथवा सेवन किंवा साठवण होत असल्यास जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्ष, जिल्हा रुग्णालयात तक्रार नोंदवून नांदेड जिल्हा तंबाखू मुक्त करण्याच्या या अभियानास सहकार्य करावे असे, आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.

00000






No comments:

Post a Comment

  वृत्त क्रमांक   461 शेतकऱ्यांना बियाणे, खते, कीटकनाशके यांची कमतरता भासू देऊ नका  : पालकमंत्री अतुल सावे                                  ...