वृत्त क्र. 456
इयत्ता दहावी पुरवणी परीक्षेच्या वेळापत्रकात बदल
नांदेड (जिमाका) दि. 28 :- माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत जुलै-ऑगस्ट 2023 मध्ये घेण्यारी येणारी इ. 10 वीची पुरवणी परीक्षा 18 जुलै ते 1 ऑगस्ट 2023 व इयत्ता 12 वीची पुरवणी परीक्षा 18 जुलै ते 10 ऑगस्ट 2023 या कालावधी आयोजित करण्यात आलेली आहे. तथापि राज्यातील काही जिल्ह्यामध्ये 28 जुलै 2023 रोजी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलेला आहे. त्यामुळे इयत्ता 10 वीच्या पुरवणी परीक्षेतील 28 जुलै 2023 रोजीच्या वेळापत्रकामध्ये बदल करण्यात येवून ही परीक्षा 3 ऑगस्ट 2023 रोजी घेण्यात येणार आहे संबंधितानी यांची नोंद घ्यावी, असे आवाहन मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी केले आहे.
माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा इ. 10 वी वेळापत्रकातील सामाजिक शास्त्रे पेपर 1 इतिहास व राज्यशास्त्र शुक्रवार 28 जुलै 2023 सकाळ सत्र 11 ते 1 या कालावधीत होणार होती. सदर परीक्षा सामाजिक शास्त्रे पेपर 1 इतिहास व राज्यशास्त्र गुरुवार 3 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी 11 ते 1 या वेळेत घेण्यात येईल. माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा इ. 10 वी पुरवणी परीक्षा लेखी व अन्य परीक्षेच्या उर्वरित वेळापत्रकामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. तरी वेळापत्रकातील या बदलाची सर्व संबंधित माध्यमिक शाळा, मुख्याध्यापक, विद्यार्थी, पालक, परीक्षक, केंद्र संचालक व अन्य संबंधितानी यांची नोंद घ्यावी, असे महामंडळाने प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.
00000
No comments:
Post a Comment