वृत्त क्र. 458
दूध व दुग्धजन्य पदार्थात भेसळ केल्यास होईल कार्यवाही
नांदेड (जिमाका) दि. 28 :- जिल्ह्यात अनेक ठिकाणी दूध व दुग्धजन्य पदार्थामध्ये भेसळ होत असल्याचे आढळून येत आहे. दूध व दुग्धजन्य पदार्थामधील भेसळ रोखण्यासाठी जिल्हास्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीमार्फत पथके निर्माण करुन या दूध व दुग्धजन्य पदार्थाची तपासणी करण्यात येणार आहे. या तपासणीत दोषी आढळून येणाऱ्यांवर कडक कार्यवाही करण्यात येईल, असे जिल्हा दुग्धव्यवसाय विकास अधिकारी नांदेड यांनी कळविले आहे.
दूध व दुग्धजन्य पदार्थात भेसळ केल्यामुळे उत्पादनात व मागणीमध्ये मोठया प्रमाणात तफावत निर्माण होवून या पदार्थाचा कृत्रिम फुगवटा निर्माण होत आहे. यामुळे दुध उत्पादक शेतकऱ्यांच्या दुधाला रास्त भाव मिळत नाही. दूध व दुग्धजन्य पदार्थात भेसळ मुळे नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. या अनुषंगाने दूध व दुग्धजन्य पदार्थामध्ये होणाऱ्या भेसळीला पायबंद घालण्यासाठी जिल्हास्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे.
0000
No comments:
Post a Comment