Monday, November 11, 2019


रब्बी हंगामाचे क्षेत्र तिप्पट करणार
--- जिल्हाधिकारी अरुण डोंगरे  
नांदेड, दि. 11:- नांदेड जिल्ह्याचे रब्बीचे क्षेत्र हे 1 लाख 36 हजार हेक्टर असून या वर्षी यामध्ये तिप्पट वाढ करण्याचे सुचना जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी केले. आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या निजी सभागृहात जिल्हाधिकारी श्री. डोंगरे यांनी सुचना केल्या.
या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे, निवासी उपजिल्हाधिकारी सचिन खल्लाळ, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवीशंकर चलवदे, कापूस संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ श्री. पाटील, पोखरणी कृषी विज्ञान केंद्रचे डॉ. देविकांत देशमुख, महाबीजचे जिल्हा व्यवस्थापक ए.टी. निकम, बियाणे विक्रेते संघाचे राज्यस्तरीय उपाध्यक्ष बिपीन कासलीवाल, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता, कृषि विभागाचे सर्व उपविभागीय कृषि अधिकारी व तालुका कृषी अधिकारी यांची या बैठकीस उपस्थिती होती.
यावर्षी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे सुमारे साडे सहा लाख हेक्टरवर नुकसान झालेले असून शेतकऱ्यांना कांही अंशी उत्पादन मिळविण्यासाठी रब्बी हंगामाचा पेरा मोठ्या प्रमाणावर वाढविणे शक्य आहे. जिल्ह्यातील विविध धरणातील पाणी साठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून जलयुक्त शिबीराच्या कामामुळे विहीरींच्या कामामुळे विहीरींच्या पाणी पातळीत वाढ झालेली आहे. तसेच ऑक्टोबरमध्ये झालेल्या पावसामुळे जमिनीत मोठ्या प्रमाणावर ओलावा उपलब्ध आहे. याचा फायदा घेवून शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर हरभरा गहू, करडई या रब्बी पिकांची तसेच उन्हाळी ज्वारी व उन्हाळी भुईमुग या पिकांची पेरणी करावी, असे आवाहन यावेळी जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी केले.
यासाठी महाबीज व राष्ट्रीय बीजनिगम यांनी मागणीप्रमाणे अनुदानावर बियाणे पुरवठा करण्यात यावा, असे सुचविले . तसेच खाजगी कंपन्याचीदेखील मोठ्या प्रमाणावर बियाणे उपलब्ध करुन घ्यावे, असे सांगितले.
शेतकऱ्यांनी स्वत: जवळील तसेच खुल्या बाजारातील हरभरा घेवून उगवण शक्ती तपासून पेरणी करावी, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवीशंकर चलवदे यांनी सुचविले.
शेतकऱ्यांना विद्युत पुरवठा खंडित होवू नये, यासाठी खबरदारी घेण्याबाबत सुचना दिल्या. तसेच पाटबंधारे विभागाने शेतकऱ्यांच्या मागणीप्रमाणे रब्बी हंगामासाठी पाणी पुरवठा करावा, असे सांगितले.
अनुदानावर विक्री करण्यात येणाऱ्या बियाणांच्या माहिती पत्रकाचे जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांच्या हस्ते विमोचन करण्यात आले.
14 हजार 10 क्विंटल बियाणे अनुदानावर पुरवठा करण्यात येणार असून आतापर्यंन्त 8 हजार 221 क्विंटल पुरवठा करण्यात आलेला आहे, आणि उर्वरित बियाणे आठ दिवसात उपलब्ध होतील, असे महाबीजचे जिल्हा व्यवस्थापक ए.टी.निकम यांनी सांगितले.
यापेक्षा अधिक बियाणांची मागणी वाढल्यास शासनाकडे मागणी करण्यात येणार असल्याचे व कोणत्याही बियाणांची कमतरता भासू दिली जाणार नाही, असे जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी सांगितले.
0000

No comments:

Post a Comment

वृत्त क्र.   93 दहावी परीक्षेच्या ऑनलाईन प्रवेशपत्राबाबत सूचना   नांदेड दि. 23 जानेवारी :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्ष...