Monday, November 11, 2019


पत्रकार परिषदेचे
प्रसिध्‍दी पत्रक       
                                                                             दि. 11 नोव्हेंबर 2019
केंद्र सरकारच्‍या मा‍हिती आणि प्रसारण मंत्रालयाच्‍या लोकसंपर्क आणि संचार ब्‍यूरोच्‍यावतीने प्रादेशिक लोकसंपर्क ब्‍यूरो अतंर्गत विवीध ठिकाणी कार्यरत असलेल्‍या क्षेत्रीय लोकसंपर्क ब्‍यूरो मार्फत केंद्र आणि राज्‍य सरकारच्‍या विवीध योजना आणि उपक्रमांची माहिती जनसामान्‍यापर्यंत पो‍हचविण्याचे कार्य केले जाते. यासाठी विवीध माध्‍यमांचा वापर केला जातो यात प्रदर्शनी , मेळावे, गीत व नाटक कार्यक्रम आदी माध्‍यमांचा समावेश आहे. देशभर विविध ठिकाणी  श्री गुरुनानक देवजी यांची 550 वी जयंती साजरी करण्‍यात येत आहे. यानुसार माहिती आणि‍ प्रसारण मंत्रालयाच्‍यावतीने देशात 13 ठिकाणी बहुमाध्‍यम प्रदर्शनीचे आयोजन करण्‍यात येत आहे. यापैकी एक असलेल्‍या नांदेड शहरातील जिल्हा परिषद मल्‍टीपर्पज हायस्‍कुल मैदानावर बहुमाध्‍यम प्रदर्शनीचे आयोजन करण्‍यात येत आहे. दिनांक 12 नोव्‍हेंबर 2019 रोजी सकाळी ठिक 11:30 वा. केंद्रीय माहिती  व प्रसारण मंत्री मा. प्रकाशजी जावडेकर यांच्‍या हस्‍ते या बहुमाध्‍यम प्रदर्शनीचे उद्घाटन होणार आहे. या उद्घाटन सोहळयाला केंद्र आणि राज्‍य शासनाचे लोकप्रतिनीधी, पदाधिकारी आणि अधिकारी आदींची प्रमुख उपस्‍थीती असणार आहे.
दिनांक 12 ते 18 नोव्‍हेंबर 2019 दरम्यान 10 हजार चौ.फुट जागेवर उभारण्‍यात येत असलेल्‍या अत्‍याधुनिक व वातानुकुलीत बहुमाध्‍यम प्रदर्शनात श्री गुरूनानक देवजी यांच्‍या जवनावर आधारित माहिती मिळणार आहे. वायरलेस हेडफोनच्‍या साहयाने एलईडी स्‍क्रीनवर श्री गुरूनानक देवजी यांचे जवनकार्य बघावयास मिळणार आहे.  नांदेड शहरात प्रथमच आयोजित होत असलेल्‍या या प्रदर्शनीमध्‍ये व्‍ही. आर. तंत्रज्ञानाच्‍या मदतीने असलेल्‍या कर्तारपुर साहेब आणि नानकानासाहेब या गुरूव्‍दारांचे दर्शन या प्रदर्शनातून घडणार आहे.
 लाईट आणि साऊंड शो या प्रदर्शनाचे आकर्षण ठरणार असून याव्‍दारे श्री गुरूनानक देवजी यांचे जीवनकार्य बघावयास मिळणार आहे. शीख धर्मात महत्‍वाचे स्‍थान असणाऱ्या शबद आणि उदासीची माहिती या प्रदर्शनाव्‍दारे मिळणार आहे. तत्‍कालीन वस्‍तु, साहीत्‍यांचा संग्रह या ठिकाणी बघावयास मिळणार आहे. प्रदर्शनीच्या मध्‍यभागी डीजिटल ट्री लावणयात येणार असून यावर असलेल्‍या चित्रांमधुन श्री गुरूनानक देवजी यांच्‍या कार्याची ओळख होणार आहे. स्‍मार्ट फोन वापरणाऱ्यांसाठी अत्‍याधुनिक सेल्‍फी पाॅईंट तयार करण्‍यात आला आहे.  संपुर्ण प्रदर्शनी बघीतल्‍यानंतर सर्वात शेवटी भेट देणाऱ्या प्रत्‍येक व्‍यक्‍तीला प्रदर्शनावर आधारित स्‍पर्धेमध्‍ये भाग घेऊन सन्‍मानचिन्‍ह  मिळविता येइल. या प्रदर्शनीला भेट देण्‍यासाठी शहरातील महिला बचतगट, शालेय विद्यार्थी, अंगणवाडी सेविका यांना प्रशासन आणि स्‍वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापिठाच्‍यावतीने  सूचना देण्‍यात आल्‍या आहेत.  तसेच देश-विदेशातून येणाऱ्या शिख श्रध्‍दालूंना गुरूव्‍दारा बोर्डाच्‍यावतीने विविध स्‍तरावर माहिती देण्यात येत आहे. हे प्रदर्शन सर्व जनतेसाठी सकाळी 11 ते रात्री 8.30 वाजेपर्यंत खुले राहणार असून प्रवेश विनामुल्‍य असणार आहे.
           

(जिल्हाधिकारी अरुण डोंगरे आणि माहिती व प्रसारण मंत्रालयाचे संचालक संतोष अजमेरा  यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात आायेजित पत्रकार परिषदेत दिलेली माहिती दिली.
यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे, उपवनसंरक्षक अशिष ठाकरे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. सचिन खल्लाळ, माहिती व प्रसारण मंत्रालयाचे सहायक संचालक निखिल देशमुख यांच्यासह विविध माध्यम प्रतिनिधी उपस्थित होते. )
000000

No comments:

Post a Comment

वृत्त क्र.   93 दहावी परीक्षेच्या ऑनलाईन प्रवेशपत्राबाबत सूचना   नांदेड दि. 23 जानेवारी :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्ष...