Monday, November 11, 2019


नांदेड जिल्ह्यातील 154 रिक्त पदांचा समावेश  
ग्रामीण डाक सेवकाच्या 3 हजार 650 पदांसाठी भरती ;
अर्जाची 30 नोव्हेंबर मुदत ; दहावीच्या गुणवत्तेनुसार निवड होणार
नांदेड, दि. 11 :- ग्रामीण डाक सेवक या पदासाठी भारतीय डाक विभागाकडून ऑनलाईन भरती होणार आहे.   महाराष्ट्र राज्यासाठी 3 हजार 650 जागा रिक्त असून यात नांदेड जिल्ह्यासाठी 154 ग्रामीण डाक सेवकांची पदे रिक्त आहेत. या भरती प्रक्रियेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची मुदत शनिवार 30 नोव्हेंबर 2019 पर्यंत आहे. जिल्ह्यातील दहावी उत्तीर्ण उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने दिलेल्या संकेतस्थळावर अर्ज भरावेत असे आवाहन नांदेड डाक अधिक्षक यांनी केले आहे.
या पदासाठी उमेदवार दहावी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. विशेष म्हणजे या भरतीसाठी लेखी परीक्षा घेण्यात येणार नसून फक्त दहावीच्या गुणातील गुणवत्तेनुसारच निवड करण्यात येणार आहे. उमेदवार संगणकाचे ज्ञान असणे गरजेचे आहे. तसेच स्थानिक भाषेचे (मराठी) ज्ञान असणे आवश्यक आहे. अर्जदार हा 18 ते 40 वर्ष वयोगटातील असावा. ओबीसीसाठी 3 वर्ष, एससी/ एसटीसाठी 5 वर्ष आणि अपंगासाठी 10 वर्ष वयाची अट शिथिल करण्यात आली आहे. जे उमेदवार ओबीसी, एसी, एसटी पदासाठी आरक्षित नसतील तेच उमेदवार आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय (EWS) पदासाठी पात्र असतील. EWS पदासाठी उमेदवाराची वयोमर्यादा 18 ते 40 वयोगटातील असावी.
नांदेड डाक विभागातील एकूण 154 जागांपैकी खुल्या प्रवर्गासाठी 75, एससी साठी 14 , एसटी साठी 12 आणि ओबीसीसाठी 38 तसेच ईडब्लुएस EWS साठी 15 जागा आरक्षित केल्या आहेत. या भरतीसाठी अर्जदारांनी  https://indiapost.gov.in अथवा http://appost.in/gdsonline या संकेतस्थळाला भेट द्यावी व ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावा. ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याची मुदत 1 नोव्हेंबर 2019 ते शनिवार 30 नोव्हेंबर 2019 पर्यंत आहे. संबंधित संकेतस्थळावर पात्रता निकष याविषयी सर्व माहिती नमूद केली आहे. नांदेड जिल्ह्यातील दहावी उत्तीर्ण उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने दिलेल्या संकेतस्थळावर अर्ज भरावेत असे आवाहन नांदेड डाक अधिक्षक यांनी केले आहे.
00000


No comments:

Post a Comment

वृत्त क्र.   93 दहावी परीक्षेच्या ऑनलाईन प्रवेशपत्राबाबत सूचना   नांदेड दि. 23 जानेवारी :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्ष...