Monday, November 11, 2019


ठेलारी जमातीच्या हरकती, सुचना   
13 नोव्हेंबरला सादर करण्याचे आवाहन
नांदेड, दि. 11 :- महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाने ठेलारी या जमातीच्या मागणी संदर्भात जाहिर केलेल्या जनसुनावणीस संस्था, संघटना, व्यक्तींना निवेदन, हरकती व सुचना लेखी स्वरुपात मांडावयाच्या असतील त्यांनी आपले लेखी निवेदने, हरकती, सुचना बुधवार 13 नोव्हेंबर 2019 रोजी नवीन नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर धुळे येथे सकाळी 11 ते सायं. 5 यावेळेत सादर करावीत, असे आवाहन पुणे महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य सचिव डी. डी. देशमुख यांनी केले आहे.
महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोग पुणे यांच्याकडे ठेलारी (भटक्या जमातीचा-ब) या जमातीचा समावेश राज्य शासनाच्या भटक्या जमातीच्या अ. क्र. 29 धनगरची तत्सम म्हणून (भटक्या जमाती-क मध्ये) समावेश करण्याबाबत निवेदन प्राप्त झाले आहे.
याबाबत ठेलारी (महाराष्ट्र शासनाच्या (भटक्या जमाती-ब) अ. क्र. 27 वर या जमातीची नोंद आहे. तर ठेलारी (भ.ज.-ब) या भटक्या जमातीचा समावेश धनगर या जमातीची (भ.ज.-क) तत्सम म्हणून समावेश करण्याबाबत मागणी आहे. या जनसुनावणीसाठी महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य डॉ. सुवर्णा रावळ, डॉ. भुषण कर्डीले, डॉ. राजाभाऊ करपे, डी. डी. देशमुख सदस्य सचिव उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती प्रसिद्धी पत्रकात आयोगाचे सदस्य सचिव यांनी दिली आहे.  
0000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...