नांदेड
येथील बहुमाध्यम प्रदर्शनीचे उद्घाटन संपन्न
श्री
गुरुनानक देवजीनी सत्याच्या मार्गाने
पुढे
जाण्याची शिकवण दिली
-
केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर
नांदेड,
दि. 12 :- श्री गुरुनानक देवजीने ज्ञानाबरोबर
सत्याच्या मार्गाने पुढे जाण्याची शिकवण दिली असून त्यांच्या कार्याची आठवण करुन सर्वांनी एकजूट होऊन सत्याच्या मार्गाने भेदभाव
विरहित समाज निर्मितीसाठी पुढे आले पाहिजे, असे प्रतिपादन पर्यावरण,
वन व जलवायु परिवर्तन आणि माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी
केले.
श्री
गुरुनानक देवजी यांच्या 550 व्या
जन्म जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या “बहुमाध्यम प्रदर्शनीचे उद्घाटन
येथील मल्टीपर्पज हायस्कूल प्रांगणात फित कापून केंद्रीय
मंत्री श्री. जावडेकर यांच्या हस्ते करण्यात आले.
त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी खासदार प्रताप पाटील चिखलीकर, आमदार
राजेश पवार, महापौर श्रीमती दीक्षा धबाले, माहिती अणि प्रसारण विभागाचे पश्चिम
विभागाचे महासंचालक आर. एन. मिश्रा, अतिरिक्त महासंचालक डी. जे. नरेन, महाराष्ट्र आणि गोवा राज्याचे संचालक संतोष अजमेरा, जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, पोलीस
अधीक्षक विजयकुमार मगर तख्त सचखंड श्री गुरुद्वारा बोर्डाचे अधीक्षक गुरविंदर सिंघ
वाधवा, जिल्हा परिषदेच्या सदस्या श्रीमती पुनम पवार आदींची उपस्थिती होती.
केंद्रीय मंत्री श्री. जावडेकर म्हणाले, श्री
गुरुनानक देवजी यांनी जगाला ज्ञान देण्याचे मौलिक कार्य केले आहे. एक ओमकार, एक सत्य
हा मंत्र त्यांचा असून जीवनात प्रामाणिक कष्ट करण्याचा संदेश त्यांनी दिलेला आहे. श्री
गुरु नानक देवजी यांचे कार्य आणि तत्वज्ञान समाजासाठी महत्वाचे योगदान देणारे आहे.
नांदेडच्या तख्त सचखंड श्री हुजूर साहिब गुरुद्वारावर आधारीत
एक फिल्म लवकरच तयार
करण्यात येईल, अशी घोषणाही केंद्रीय मंत्री श्री. जावडेकर यांनी यावेळी केली.
उद्घाटनानंतर श्री. जावडेकर यांनी श्री गुरुनानकजी यांच्या
प्रतिमेचे पूजन करुन एलईडी स्क्रीनद्वारे कर्तारपुर साहेब आणि नानकानासाहेब या गुरूव्दारांचे दर्शन
या प्रदर्शनीतून घेतले. शबद आणि चार उदासीची माहिती एलईडी स्क्रीनद्वारे घेतली.
त्याचबरोबर श्री गुरुनानकजी यांच्या जीवनावर आधारीत लाईट व साउंड शो तसेच मुख्य
कार्यक्रमाच्या सुरुवातीला शालेय विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या शीख मुलमंत्रांने
सर्वांची मने जिंकली.
आजपासून सोमवार 18 नोव्हेंबर 2019 पर्यंत सकाळी
11 ते रात्री 8.30 वाजेपर्यंत चालणाऱ्या या बहुमाध्यम प्रदर्शनात श्री गुरूनानक
देवजी यांच्या जीवनावर आधारित माहिती मिळणार आहे. वायरलेस
हेडफोनच्या साहयाने एलईडी स्क्रीनवर श्री गुरूनानक
देवजी यांचे जीवनकार्याबाबतची माहिती पहावयास मिळणार आहे. नांदेड शहरात प्रथमच आयोजित केलेल्या या प्रदर्शनीमध्ये व्ही. आर. तंत्रज्ञानाच्या मदतीने
असलेल्या कर्तारपुर साहेब आणि नानकानासाहेब या गुरूव्दारांचे दर्शन या
प्रदर्शनातून घडत आहे. प्रदर्शनी
सर्वांसाठी सात दिवस मोफत खुली ठेवण्यात आले आहे, याचा लाभ नागरिक व विद्यार्थ्यांनी
घ्यावा, असेही आवाहन यावेळी आयोजकामार्फत करण्यात आले.
00000
No comments:
Post a Comment